Mumbai Rain News : राज्याच्या काही भागात दमदार पावसाने हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही भागात अद्यापही चांगला पाऊस पडलेला नाही. मुंबईसह ठाणे पालघऱ, पुणे कोकण या भागात चांगला पाऊस झाला आहे. मुंबईत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगाव,मालाड कांदिवली,बोरिवली,दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ,वांद्रे परिसरात सध्या पावसाच्या जोरदार बॅटिंग सुरू आहे. पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळं अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे.
पश्चिम उपनगरात अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव, विलेपार्ले, वर्सोवा परिसरात पावसाचा जोर जास्त आहे. जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पश्चिम उपनगरात सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. सबवे मध्ये दीड ते दोन फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे बंद असल्यामुळे अंधेरी पूर्व ते पश्चिम ला जाण्यासाठी गोखले पुलाचा वापर करा वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना आवाहन.
भंडारा जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस
राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे तर काही भागात पाऊस पडत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसानंतर भंडाऱ्याच्या तुमसरात जलमय स्थिती झाली आहे. तुमसरात पेट्रोल पंपही जलमय झाला. मध्यप्रदेशला जोडणाऱ्या मार्गावर पाणी साचले आहे. भंडारा शहरासह ग्रामीण भागात आज मुसळधार पावसानं हजेरी लावली. सुमारे दोन तासपर्यंत पावसाची धूमशान सुरू होती. मुसळधार पावसामुळं तुमसरात जलमयस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळं महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशला जोडणारा तुमसर शहरातून जाणारा महामार्ग जलमय झाला. या महामार्गावरून जाताना वाहनधारकांना मोठी कसरत करून प्रवास करावा, लागला. या सोबतचं तुमसर शहरातील अंतर्गत रस्ते आणि एक पेट्रोल पंप पाण्याखाली आला. तुमसर नगर परिषदेच्या नियोजनाअभाही मुसळधार पावसानं तुंबलेल्या रस्त्यावरून मार्ग काढतांना नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्यानं नागरिकांमध्ये संताप बघायला मिळाला. सध्या पावसाचा जोर कमी झाल्यानं पावसाचं पाणी कमी व्हायला सुरुवात झाली आहे.
अमरावती जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अमरावती शहरासह परिसरातील ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली आहे. वरुण राजा बरसल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना जीवनदान मिळाले आहे.
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप