Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली – Marathi News | Kuldeep yadav take big decision after continuously out of playing xi


भारतीय संघाने मागील काही दिवसांत अनेक मालिका खेळल्या. या मालिकेत प्रत्येकवेळी संघ बदलला गेला. भारतीय संघाला बदलेल्या कॅम्बिनेशनमुळे पराभव पत्कारावा लागला. सामन्यात कुलदीप यादवला न खेळवल्यामुळे अनेकांनी शुभमन गिल आणि गौतम गंभीरवर अनेक प्रश्न उपस्थित केले. अनेकांनी अनेक टीका केल्या. कुलदीप यादवला संघातून वगळण्याचा निर्णय कोणालाच पटल नाही. आता कुलदीप यादवनेही भारतीय संघात सतत जागा मिळत नसल्याने एक निर्णय घेतला आहे. कुलदीप यादवने आता एक मोठे पाऊल उचलले आहे.

जेव्हा भारतीय संघ इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका हरला, तेव्हा कुलदीप यादवला अंतिम संघातून वगळल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. कुलदीपने आता काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तो 24 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान इंग्लंडमध्ये होणाऱ्या यॉर्कशायरच्या देशांतर्गत एकदिवसीय चषक स्पर्धेत यॉर्कशायरचे प्रतिनिधित्व करणार आहे. कुलदीप काउंटी चॅम्पियनशिपमध्ये यॉर्कशायरसाठी तीन सामनेही खेळणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचा संघ, ज्यामध्ये त्याचा समावेश होण्याची शक्यता आहे, तो अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे, कुलदीप मायदेशी परत येईल आणि त्यानंतर काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी परत येईल.

इंग्लंड दौऱ्यादरम्यान खेळल्या गेलेल्या तीनही एकदिवसीय सामन्यांमध्ये कुलदीप यादव खेळला नाही आणि लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाल्यानंतर त्याला अंतिम 11 खेळाडूंमधून वगळल्याने मोठे प्रश्न निर्माण झाले होते. काउंटी चॅम्पियनशिपमध्ये यॉर्कशायरसाठी खेळण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल कुलदीप यादव म्हणाला, “मला इंग्लंडच्या मैदानांवर खेळण्याचे आव्हान नेहमीच आवडले आहे आणि व्यवस्थापनाशी बोलल्यानंतर, मी संघात सामील होण्यासाठी खूप उत्सुक आहे.” कुलदीपने आतापर्यंत तीन वेळा इंग्लंडचा दौरा केला असून, 2018 मध्ये त्याने फक्त एक कसोटी सामना खेळला, ज्यात त्याने केवळ नऊ षटके गोलंदाजी केली.

यॉर्कशायरने सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांच्यासह काही अत्यंत यशस्वी भारतीय खेळाडू घडवले आहेत. चेतेश्वर पुजारा आणि मयंक अग्रवाल हे देखील या काउंटी क्लबचा भाग होते. ऋतुराज गायकवाडने 2025 मध्ये यॉर्कशायरसोबत करार केला होता, परंतु नंतर वैयक्तिक कारणांमुळे तो संघातून बाहेर पडला. कुलदीप यादव यॉर्कशायरकडून खेळणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरेल. काउंटी चॅम्पियनशिपमध्ये कुलदीप यादव कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *