Salman Khan Breaks Silence on Health Buzz: बॉलिवूडचा दंबग खान (Salman Khan) अर्थात सलमान खान पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. सलमान खान नेहमी सोशल मीडियात चर्चेत असतात. त्याच्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो (Latest Viral Video ). अलिकडेच सलमान खानचा नवा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. फोटोमध्ये अभिनेता आजारी आहे की काय? असा प्रश्न निर्माण करण्यात येत होता. अलिकडेच सलमान खान मुंबईतील स्लम रिहाबिलिटेशन अथॉरिटी (SRA) येथील एका कार्यक्रमात गेला होता. सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत पडले होते. त्याच्या प्रकृतीविषयी विचारपूस करु लागले होते. दरम्यान, यावर सलमान खानने एक पोस्ट आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. त्यानं आपल्या काऊबॉय अंदाजात फोटो शेअर केला आहे. तसेच फोटो शेअर करत हटके कॅप्शन दिलं आहे.
सलमान खानचा व्हिडीओ झाला होता व्हायरल (Salman Khan post on viral video)
सलमान खानच्या व्हिडीओमुळे काल धुमाकूळ उडाला होता. सलमान खान क्रिम रंगाचा शर्ट आणि जीन्स घालून मुंबईतील स्लम रिहाबिलिटेशन अथॉरिटी (SRA) यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गेला होता. यावेळी भाईजानने अथॉरिटीचे नवे डेटा कलेक्शन आणि व्हेरिफिकेशन सपोर्ट सेंटरचे उद्घाटन केले होते. सलमान खानने आतापर्यंत रुबाबदार आणि स्टायलिश शैलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. पण आता त्याचा असा लूक पाहून चाहत्यांना त्याच्या प्रकृती विषयी सतावत आहे. काल त्याचा या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियात झपाट्याने व्हायरल झाला.
सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल होताच, अभिनेत्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. सलमान खानने आपल्या काऊबॉय अंदाजात फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोला हटके कॅप्शन दिलं आहे. ‘आप लोगों की तबीयत कैसी है?’ असा प्रश्न त्यानं फॅन्सना विचारला. सलमान खानने ब्लॅक अँड व्हाईट अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. यात त्याने वेगवेगळे हॅट्स घालून फोटो काढले तसेच शेअर केले आहेत. यात सलमान खान फिट आणि काही प्रमाणात बारीक झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. चेहऱ्यावर हलकी दाढी आणि सिरिअस लूक यात दिसत आहे.
सलमान खानची ही पोस्ट सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली आहे. एकाने यावर प्रतिक्रिया देत म्हटले की, ‘सगळं ठीक आहे भाऊ… तुम्ही भ्रष्टाचार आणि इतर मुद्द्यांवरही बोलायला हवं’. तर, आणखी एका नेटकऱ्याने, ‘जर तुम्ही ठीक असाल तर, आम्ही देखील ठीक आहोत सर, तुम्ही कसे आहात ते सांगा’, असं म्हणत सलमान खानची विचारपूस केली. सध्या सलमान खानची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून, त्याच्या न्यू लूकवर चाहते घायाळ झाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल