Delhi Jantar Mantar Protest: राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेस जनता पार्टीकडून पुकारण्यात आलेल्या चलो संसद आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे वेगळं वळण लागलं आहे. दिल्लीमध्ये लाखोंचा जमाव रस्त्यांवर उतरला असून हजारो विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र सरकारकडून त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आल्याने आणि सोनम वांगचुक आमरण उपोषणावर असतानाही तब्बल तीन आठवडे कोणत्याही प्रकारे संवाद न साधल्याने विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. तोच उद्रेक आज दिल्लीच्या रस्त्या-रस्त्यांवरती आणि संसदेच्या प्रांगणामध्ये दिसून येत आहे.
🚨#ALERT: GEETANJALI JI’S HAIR PULLED BY DELHI POLICE, ASSAULTED.
A 12 YEAR OLD GIRL’S HEAD HAS BEEN BROKEN. 40-50 OTHER HEADS BROKEN!@DelhiPolice WHAT IS GOING ON!?
— Saurav Das (@SauravDassss) July 20, 2026
गीतांजली यांना केसाला धरून खेचलं
संसदेच्या 150 मीटर अंतरावर विद्यार्थी पोहोचले असून त्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून अमानुष पद्धतीने बळाचा वापर केला जात आहे. इतकेच नव्हे तर तब्बल 40 ते 50 जणांची डोकी फोडण्यात आली असून अनेकांना रक्तबंबाळ करण्यात आलं आहे. अनेक तरुणांना, विद्यार्थ्यांना रस्त्यावरच पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली असून अनेकांना गंभीर पद्धतीने मारहाण केली आहे. अनेक तरुणींची सुद्धा डोकी फोडण्यात आली आहे. दरम्यान, काॅकरोच जनता पार्टीने ट्वीट करत सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांना सुद्धा केसाला धरून खेचल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर 12 वर्षांच्या मुलीसह 40 ते 50 जणांची डोकी फोडून फोडली, असा गंभीर आरोप काँग्रेस जनता पार्टीने ट्वीट करत केला आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांची मग्रुरीने आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.
The @DelhiPolice dragged Sonam Sir’s wife by hair out of the protest and continues to Lathi charge innocent protestors pic.twitter.com/ofWzkaWd4S
— Cockroach is Back (@Cockroachisback) July 20, 2026
दिल्लीच्या अनेक रस्त्यांवर, अनेक मेट्रो स्टेशनवर फक्त आणि फक्त विद्यार्थीच दिसत असून त्यांचा संतापाचा उद्रेक प्रत्येक कृतीमधून दिसून येत आहे. पोलिसांकडून संसद परिसरामध्ये अत्यंत तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अनेक बंदुकधारी पोलीस गेटच्या दिशेने तैनात करण्यात आले आहेत, तर अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे आंदोलनकर्ते रस्त्यांवरून सैरावैरा पळताना दिसून आले. त्यामुळे एक प्रकारे आंदोलनाला ज्या पद्धतीने चिरडण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, त्यामुळेच आंदोलन वेगळ्या दिशेने जात आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे पहिल्यांदा अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र नंतर पोलिसांकडून नकार देण्यात आला. त्यानंतर काँग्रेस जनता पार्टीने सुद्धा ट्वीट करत याला दुजोरा देताना अभिजीत पोलिसांच्या ताब्यात नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, सोनम वांगचुक यांनी केलेल्या विनंतीनंतर अभिजीत दिपके यांनी आपलं आमरण उपोषण स्थगित केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम