Ramayana trailer leak: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर ‘रामायण: पार्ट 1’ (Ramayan) या बहुप्रतिक्षित सिनेमाच्या ट्रेलरच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. या सिनेमातून रणबीर कपूर भगवान राम यांच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमातील रणबीर कपूरचा फर्स्ट लूक व्हायरल झाला होता. या सिनेमाची सोशल मीडियात प्रचंड चर्चा सुरू आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या ट्रेलरबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. ‘रामायण: पार्ट 1’ या सिनेमाचा ट्रेलर त्याच्या अधिकृत डिजिटल प्रदर्शनापूर्वीच सोशल मीडियावर लीक झाला आहे. ट्रेलर लीक झाल्यानंतर सिनेमाच्या फिल्ममेकर्सने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.
रणबीर कपूर स्टारर ‘रामायण: पार्ट 1’ सिनेमाचा ट्रेलर लीक (Ramayana Part 1 has leaked online ahead of its official release)
दिल्ली येथे खास ‘प्रथम संकल्प’च्या इव्हेंटमध्ये 1 मिनिट 28 सेकंदचा किल्प, स्क्रिनिंगच्या काही तास सोशल मीडियात व्हायरल झाला. दरम्यान, यावर चित्रपट निर्मात्यांनी मोठं पाऊल उचललं आहे. चित्रपट निर्माते नमित मल्होत्रा आणि सिनेमाची लीगल टीम, लीक झालेला ट्रेलर हटवण्यासाठी अँटी – पायरसी ऑपरेशन सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘रामायण: पार्ट 1’ या सिनेमाचा ट्रेलर 24 जुलै रोजी रिलीज करण्यात येणार होते.
दरम्यान, फिल्ममेकर्सने अनऑफिशियल क्लिप न बघण्याची प्रेक्षकांना विनंती केली आहे. ‘रामायण: पार्ट 1’ या सिनेमाचा खास प्रिव्ह्यू केवळ नवी दिल्ली येथील ‘प्रथम संकल्प’च्या इव्हेंटमध्ये सहभागी होणाऱ्या पाहुण्यांसाठी होता. कुणीतरी फोनमधून रेकॉर्ड करुन ट्रेलरचा क्लिप सोशल मीडियात व्हायरल केला आहे. 1 मिनिट 28 सेकंदच्या व्हिडीओमध्ये रणबीर कपूरच्या एन्ट्रीचा सीन आहे. तर, आणखी एका व्हायरल व्हिडीओमध्ये यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे.
चित्रपट निर्माते नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शक नितेश मल्होत्रा यांच्या परवानगी शिवाय अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओच्या विरोधात अँटी – पायरसी पार्टनर आणि लीगल टीम काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रोडक्शनच्या संबंधित सुत्रांनी सांगितलं की, शनिवारी रात्रीपासून ‘रामायण: पार्ट 1’ या सिनेमाचा लीक झालेला ट्रेलर हटवण्याचं काम सुरू आहे. माहितीनुसार, ‘रामायण: पार्ट 1’ या सिनेमाचा ऑफिशियल ट्रेलर 24 जुलै रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. 8 नोव्हेंबर 2026 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: