Crime : सियापेक्षा डेंजर निघाली दामिनी! झोपेच्या गोळ्या, अपघातातून वाचला नवरा, शेवटी असा रचला कट,पोलीसही हैराण | राष्ट्रीय बातम्या


Last Updated:

बायकोने आपल्याच नवऱ्याला मारण्याचा कट रचला, त्यामध्ये पहिल्या प्रयत्नात ती अपयशी ठरली, पण दुसऱ्या प्रयत्नात तिने त्याची हत्या केली आहे. त्यामुळे सियापेक्षा दामिनी कशी डेंजर निघाली ? आणि या संपूर्ण घटनेत नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.

Meerut murder mystry
Meerut murder mystry

Crime News : पुण्यातल सिया प्रकरण तर तुम्हाला माहितीच आहे. केतन अग्रवालशी लग्न करायचं नव्हतं म्हणून तिने प्रियकराच्या मदतीने लोहगडावरून गडावरून ढकलून त्याची हत्या केली,असा आरोप आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरलेला. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत बायकोने आपल्याच नवऱ्याला मारण्याचा कट रचला, त्यामध्ये पहिल्या प्रयत्नात ती अपयशी ठरली, पण दुसऱ्या प्रयत्नात तिने त्याची हत्या केली आहे. त्यामुळे सियापेक्षा दामिनी कशी डेंजर निघाली ? आणि या संपूर्ण घटनेत नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.

खरं तर या घटनेत एके दिवशी सकाळी दामिनी रडत रडत तिच्या नवऱ्याला घेऊन हॉस्पिटलला पोहोचली. डॉक्टरने तिच्या नवऱ्याला पाहिलं आणि मृत घोषित केलं.अतुल पंवार असे तिच्या नवऱ्याचे नाव होते.या घटनेची पोलिसांना मिळताच त्यांनी आधी दामिनीची चौकशी केली.या चौकशीत तिने नवऱ्याची हत्या ही साप चावल्यामुळे झाल्याचे सांगितले.आणि पोलिसांना घटनास्थळी सापही आढळून आला होता. प्रथमदर्शनी असंच वाटतं होतं की साप चावल्यामुळे अतुलचा मृत्यू झाला असेल, पण घटनास्थळावरची परिस्थिती सामान्य नव्हती कारण साप आणि संपूर्ण कहानी पोलिसांना संशयास्पद वाटत होती.

पोलिसांना हा संशय आला म्हणून त्यांनी दामिनीचे कॉल डिटेल्स मागवले. या कॉल डिटेल्समध्ये दामिनी एकाच व्यक्तीशी जास्त वेळ कॉल करताना आणि बोलताना दिसत होती. पोलिसांनी ज्यावेळी त्या नंबरच्या व्यक्तीचा शोध घेतला तेव्हा तो दामिनी आणि अतुल यांच्या शाळेचा स्कुल ड्रायव्हर निघाला.त्याचे नाव तुषार होते. त्यामुळे पोलिसांना संशय आणखीणच बळावला.त्यामुळे पोलिसांनी दोघांचे फोन तपासले. त्यामध्ये दोघे खुप वेळेपासून एकमेकांशी बोलायचे ही बाब समोर आली. विशेष म्हणजे याच दरम्यान तुषारच्या मोबाईलमधून ड्ब्ब्यात बंद एका सापाचा फोटो मिळाला. या फोटोची चौकशी केली असता हा साप दोन गारुड्यांकडुन विकत घेतला होता.हाच या घटनेतला प्रमुख पुरावा झाला.

त्यानंतर पोलिसांनी दामिनी आणि तुषारची समोरासमोर चौकशी केली असता या घटनेचा उलगडा झाला. अतुल आणि दामिनी यांनी 2019ला लव्ह मॅरीज केलं होतं.लग्नानंतर दोघे मिळून कृष्णा किडस पब्लिक स्कुल चालवायचे. याच शाळेतील मुलांची ने आण करण्यासाठी तुषार चालकाचे काम करायचा. याच दरम्यान दामिनीची तुषार यांच्यात जवळीकता वाढली होती. तसेच तपासात अतुलच्या नावावर 20 लाखाचा जीवन विमा होता. हाच विमा हडपण्यासाठी दामिनीने प्रियकरासोबत कट रचला होता. पण हा कट रचताना तिचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला होता.

नवऱ्याला अपघाती मृत्यूचा प्रयत्न फसला

दामिनीने अतुलला संपवण्यासाठी खुप आधी पासून प्लानिंग केली होती. तिने पहिल्यांदा अतुलला अपघाती मृत्यू देण्याचा प्रयत्न केला होता.मृत्युच्या 20 दिवसांपूर्वी अतुल पंवार बाईकने जात होते. याच दरम्यान तुषारने अर्टिगा कारद्वारे अतुलच्या बाईकला धडक दिली. ही धडक खुपच भीषण होती. पण अतुलने हेल्मेट घातल्यामुळे तो या अपघातात वाचला होता.त्यामुळे दामिनीची पहिला कट अपयशी ठरला. यानंतर अतुलने संबंधित गाडी चालकावर गुन्हा दाखल करण्यास दामिनीला सांगितले होते. पण गाडीचा नंबर माहित नसल्याने दामिनीनेच तक्रार दाखल करण्यास मनाई केली होती.जर त्याच वेळेस तक्रार दाखल झाली असती तर दामिनीची सगळा कट उधळला असता.

अपघाती मृत्यू देण्यात अपयशी ठरल्यानंतर दामिनीने नवीन कट रचला.यावेळी कुणालाचा संशय यायला नको म्हणून दामिनीने अतुलला दुधातून खुप मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या दिल्या.जेव्हा अतुल गाढ झोपेत होता,तेव्हा त्याच्या चादरीत साप सोडला आणि सापाने त्याला चावा घेतला आणि त्याचा मृत्यू झाला.अतुलच्या मृत्यूनंतर तिला 20 लाखाचा विमा होता म्हणूत तिने हत्येचा कट रचला.या प्रकरणी आता पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या/देश/

Crime : सियापेक्षा डेंजर निघाली दामिनी! झोपेच्या गोळ्या, अपघातातून वाचला नवरा, शेवटी असा रचला कट,पोलीसही हैराण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *