Washim News : ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या सहा फुटीर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या सहा फुटीर खासदारांच्या गटाच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे सहा खासदार आता शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत खासदार बनले आहेत. यावर यवतमाळव वाशिमचे खासदार संजय देशमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कायदे तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन सहा खासदारांनी निर्णय घेतलाय
विकासात्मक कामासाठी आम्ही हा निर्णय घेतला होता. कायद्याप्रमाणे हा निर्णय घेतला त्यामुळे आज जो आदेश सभापतींनी काढला तो स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे सेनेतून शिंदे सेनेत गेलेल्या 6 खासदारांच्या विलिनिकरणावर लोकसभा अध्यक्षांनी सह्या केल्या आहेत. त्यावर खासदार संजय देशमुख हे वाशीममध्ये बोलत होते. आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आलेलो आहोत. कायदा तपासूनच आम्ही हा निर्णय घेतला. कायदे तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन सहा खासदारांनी आम्ही निर्णय घेतला. तरी आणि आम्ही कायदेशीर लढाई लढू अशी प्रतिक्रिया यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
सर्वसामान्य जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत, शेवटी विकास झाला पाहिजे ही प्रमुख भूमिका आहे. त्या माध्यमातून निर्णय घेतलेला आहे. अधिवेशन काळात सुद्धा या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची दोन दिवसापूर्वी भेट घेतली. या पूर्वीसुद्धा भेट घेतली होती. लोकसभा क्षेत्रामध्ये जे काही मागण्या आहेत. त्याच्या बाबतीत आम्ही निश्चितपणे तुमच्या पाठीमागे उभे राहू असे आश्वासन दिले.
विलिनीकरणावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर या सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केला. नंतर या गटाने शिंदेंच्या शिवसेनेत विलिनीकरण केलं. आता या विलिनीकरणावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे या सहाही खासदारांची खासदारकी वाचली असून ते आता शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार म्हणून काम करणार आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “ज्या लोकांनी या खासदारांना निवडून दिलं आहे त्यांची कामं होणं महत्त्वाची आहेत. आमच्याकडे आलेल्या सहा खासदारांनी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना मोठा विकासनिधी दिला जाईल.”
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम