Last Updated:
रोहित शर्मा लॉर्डसच्या मैदानावर रिटायरमेंट घेण्याची चर्चा आहे.त्यामुळे ड्रेसिंग रुममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले आहे. असे असताना रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांचा दोस्ताना लॉर्डसच्या बाल्कनीत दिसला आहे.या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Rohit Sharma News : लॉर्डसच्या मैदानावर उद्या रविवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतला शेवटचा वनडे सामना खेळवला जाणार आहेत. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दोन्ही टीम 1-1 ने बरोबरीत आहे.त्यामुळे उद्या मालिका कोण खिशात घालणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.त्यात रोहित शर्मा लॉर्डसच्या मैदानावर रिटायरमेंट घेण्याची चर्चा आहे.त्यामुळे ड्रेसिंग रुममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले आहे. असे असताना रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांचा दोस्ताना लॉर्डसच्या बाल्कनीत दिसला आहे.या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 39 वर्षीय रोहित शर्माचा वनडे वर्ल्डकप 2027 साठी निवड समिती विचार करत नसल्याचे आता त्याला सांगण्यात आले आहे.रोहित शिवाय पुढे जाण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे.त्यामुळे लॉर्डसच्या मैदानावर होणारा सामना हा रोहित शर्माचा शेवटचा वनडे सामना असणार असल्याची चर्चा आहे.या बातमीनंतर चाहत्यांसह सगळ्यांचे चेहरे पडले आहे.
सगळेजण रोहित शर्माच्या उद्याच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत.असे असताना रोहित शर्मा आज लॉर्डसच्या मैदानाव प्रॅक्टीस करताना दिसला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतो. विशेष म्हणजे तो रिटायरमेंटवरून फारसा चिंतेत दिसत नव्हता.आपला मैदानात वेळ, प्रॅक्टीस एन्जॉय करताना दिसला. या दरम्यान त्याची मैदानात गौतम गंभीर आणि सितांशु कोटकशी देखील चर्चा झाली.या संदर्भातले फोटो देखील समोर आले होते.
पण या सगळ्यात एक गोष्ट वेगळी होती ती म्हणजे रोहित शर्मा आणि गौतम गंभीर लॉर्डसच्या बाल्कनीत एकत्र होते. यावेळी त्यांच्यासोबत सितांशु कोटक आणि साईराज भाऊतुले देखील होते. रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यावेळी एकमेकांशी चर्चा करत होते. दोघांच्या चेहऱ्यावर हास्य होते.विशेष म्हणजे गौतम गंभीरला आपण आतापर्यंत अनेकदा मैदानात शांत पाहिलं त्यात त्याच्य चेहऱ्यावर हसू देखील नसतं पण यावेळी तो रोहित सोबत खळखळून हसत होता. त्यामुळे गंभीरचा रोहित सोबत एक वेगळाच दोस्ताना पाहायला मिळाला.
हा दोस्ताना पाहून टीम इंडियात सर्व काही ठीक असल्याचे जाणवत होते. बॅटींग कोच सितांशु कोटक यांनी रोहित हा भारतीय एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य आहे आणि जोपर्यंत तो संघाच्या योजनांचा भाग असेल, तोपर्यंत तो देशाचे प्रतिनिधित्व करत राहील.तसेच थोडक्यात सांगायचे तर, लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामना हा त्याचा शेवटचा सामना नसेल,” असे देवजित सैकिया यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले होते.त्यामुळे रोहितच्या रिटायरमेंटला ब्रेक लागेल असे वाटते आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 18, 2026 11:50 PM IST
Rohit Sharma : लॉर्डसच्या बाल्कनीत रोहित-गंभीरचा ‘दोस्ताना’,एकमेकांच्या जोकवर पोटधरुन हसले, रिटायरमेंटला ब्रेक? VIDEO VIRAL
