तेहरानच्या चौकात ट्रम्प कुटुंबाच्या शवापेट्या; इराणच्या कृत्याने जग हादरलं, रक्ताचा बदला रक्ताने, इराणने पुकारलं उघड युद्ध | विदेश बातम्या


Last Updated:

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावादरम्यान तेहरानमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबाला लक्ष करणारा एक वादग्रस्त आणि आक्रमक होर्डिंग लावण्यात आला आहे.

News18
News18

तेहरान/वॉशिंग्टन: अमेरिका आणि इराणमधील थेट युद्धाची ठिणगी आता कोणत्याही क्षणी पडू शकते अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणची राजधानी तेहरानच्या मध्यवर्ती भागात एक नवा आणि प्रचंड मोठा वादग्रस्त होर्डिंग (बिलबोर्ड) लावण्यात आला असून यामुळे दोन्ही देशांमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या महाकाय बॅनरवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प आणि इव्हांकासह त्यांची पाचही मुले अमेरिकन ध्वजात गुंडाळलेल्या शवापेट्यांवर उभी असलेली दाखवली आहेत. या चित्राच्या पार्श्वभूमीत जळणारे ‘व्हाईट हाऊस’ दिसत असून त्यावर पर्शियन भाषेत “रक्ताचा बदला रक्ताने” (Blood for Blood) अशी आक्रमक घोषणा ठळकपणे लिहिण्यात आली आहे.

इराणकडून ट्रम्प यांना लक्ष्य करण्याची ही दुसरी वेळ

गेल्या काही आठवड्यांत ट्रम्प यांना थेट टार्गेट करण्याची इराणची ही दुसरी वेळ आहे. याआधी तेहरानच्याच ऐतिहासिक एंगलाब स्क्वेअरवर एक मोठा बिलबोर्ड लावण्यात आला होता ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प एका खुल्या काळ्या शवापेटीत (कॉफिन) मृत अवस्थेत झोपलेले दाखवले होते. त्यांचे डोळे बंद होते आणि छातीवर लाल रंगाच्या टायवर त्यांचे हात दुमडलेले होते.

इराणमध्ये राजकीय आणि वैचारिक संदेश देण्यासाठी अशा प्रकारच्या मोठ्या भित्तीचित्रांचा आणि होर्डिंग्सचा वापर करण्याचा इतिहास जुना आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायली दलांसोबतचा संघर्ष तीव्र झाल्यापासून तेहरानमध्ये अशी अनेक अमेरिकाविरोधी आणि युद्धप्रेरित चित्रे लावली जात आहेत. यातील बहुतांश होर्डिंग्सची रचना इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) शी संबंधित असलेल्या ‘औज आर्ट्स अँड मीडिया ऑर्गनायझेशन’ने केल्याचे सांगण्यात येत आहे.

मुजतबा खमेनींची सूडाची गर्जना

हा नवा बिलबोर्ड अशा वेळी समोर आला आहे. जेव्हा इराणचे सर्वोच्च नेते मुजतबा खमेनी यांनी त्यांच्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची उघड शपथ घेतली आहे. खमेनी यांनी टेलिग्रामवर पोस्ट केलेल्या संदेशात म्हटले आहे की, हा बदला आमच्या संपूर्ण देशाची मागणी आहे आणि तो 100% घेतला जाईल. आमच्या नेत्यांच्या हत्येला कारणीभूत असणारे लोक आपल्या अंथरुणावर शांतपणे मरू शकणार नाहीत, ही इच्छा ते आपल्या सोबतच थडग्यात घेऊन जातील. खमेनी यांच्या या वक्तव्यामुळे इराण कोणत्याही क्षणी मोठा लष्करी हल्ला करू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.

इराणला बॉम्बने उडवून देऊ

इराणच्या या सततच्या धमक्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनीही अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. ‘न्यूयॉर्क पोस्ट’ला दिलेल्या एका मुलाखतीत ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, जर इराणने त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला तर अमेरिकेने काय करायचे याचे आदेश त्यांनी आधीच अधिकाऱ्यांना देऊन ठेवले आहेत.

मी बऱ्याच काळापासून इराणच्या हिटलिस्टवर आहे. मी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, जर मला काहीही झाले तर इराणला अशा पातळीवर बॉम्बने उडवून द्या, जे याआधी जगाने कधीही पाहिले नसेल. २०२० मध्ये ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात इराणचे सर्वोच्च कमांडर कासिम सुलेमानी मारले गेले होते तेव्हापासून ट्रम्प हे इराणचे मुख्य लक्ष्य राहिले आहेत

पश्चिम आशियात महायुद्धाचे सावट

दुसरीकडे दोन्ही देशांमधील या शाब्दिक युद्धानंतर प्रत्यक्ष सीमेवरही लष्करी हालचाली वाढल्या आहेत. ‘अॅक्सिओस’च्या वृत्तानुसार अमेरिकेने इस्रायलमध्ये डझनभर हवाई इंधन भरणारी (Aerial Refuelling) विमाने तैनात करण्याची तयारी सुरू केली आहे.

इराणविरुद्ध संभाव्य मोठ्या लष्करी कारवाईसाठी ही पूर्वतयारी असल्याचे मानले जात आहे. अमेरिकन आणि इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने आलेल्या वृत्तानुसार राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आगामी काही दिवसांत इराणवर थेट हल्ल्याचे आदेश देऊ शकतात. दोन्ही बाजूंकडून वाढणारा हा आक्रमक पवित्रा पाहता संपूर्ण पश्चिम आशिया पेटून उठण्याची आणि या युद्धाचा भडका उडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

मराठी बातम्या/विदेश/

तेहरानच्या चौकात ट्रम्प कुटुंबाच्या शवापेट्या; इराणच्या कृत्याने जग हादरलं, रक्ताचा बदला रक्ताने, इराणने पुकारलं उघड युद्ध



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *