Last Updated:
हृदयाचं कार्य नीट काम होत नाही, तेव्हा शरीराला ऑक्सिजन पुरवणं हृदयाला कठीण जातं. त्यामुळे, थोडे शारीरिक श्रम केले तरी श्वासाचा वेग वाढतो किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
मुंबई : लिफ्टचा वापर हल्ली सर्रास होतो, त्यामुळे जिन्याची चढ-उतार तुलनेनं कमी होते. अनेकांना खूप दिवसांनी जिन्याची चढ उतार केली तर त्रास होतो. असं होत असेल तर त्यामागची कारणं, उपचार समजून घेऊयात.
पायऱ्या चढताना काहींना श्वास घेण्यास त्रास होतो किंवा दम लागतो, याकडे केवळ सामान्य बाब म्हणून दुर्लक्ष करू नका. अनेकदा शारीरिक तंदुरुस्तीचा अभाव, अशक्तपणा, वजन वाढणं यासारख्या कारणांमुळे असं होऊ शकतं. पण, काही पायऱ्या चढल्यानंतरही वारंवार दम लागत असेल, तर ते एखाद्या अंतर्गत वैद्यकीय समस्येचं लक्षण असू शकतं.
हृदयाचं कार्य नीट काम होत नाही, तेव्हा शरीराला ऑक्सिजन पुरवणं हृदयाला कठीण जातं. त्यामुळे, थोडे शारीरिक श्रम केले तरी श्वासाचा वेग वाढतो किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
दम्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, तसंच ॲनिमिया म्हणजेच रक्त किंवा हिमोग्लोबिनची कमतरता हे देखील याचं एक कारण असू शकतं. याव्यतिरिक्त, अति वजन किंवा नियमित व्यायामाचा अभाव यामुळेही पायऱ्या चढताना श्वास लागू शकतो.
थोडेसे शारीरिक श्रम केल्यावर श्वास घेण्यास त्रास होणं, छातीत दुखणं किंवा चक्कर येणं, अथवा विश्रांती घेऊनही श्वासोच्छ्वास पूर्ववत न होणं असा त्रास वारंवार जाणवला तर या स्थितीबाबत डॉक्टरांचा नक्कीच सल्ला घ्या.
श्वासावरच्या नियंत्रणासाठी, दररोज हलका व्यायाम करणं, सकस आहार आणि निरोगी वजन राखण्याकडे लक्ष द्या. आधीच हृदय किंवा फुफ्फुसाशी संबंधित एखादा आजार असेल, तर उपचारांबाबत डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 18, 2026 11:05 PM IST
