हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत जॅस्मिन सँडलासने तिच्या पहिल्या मासिक पाळीबाबत बोलताना सांगितलं की, “माझ्या आईने मला पीरियड्सबद्दल कधीच काही सांगितलं नव्हतं आणि शाळेत याबद्दल माहिती दिली जात होती, तेव्हा मी शेवटच्या बाकावर मित्रमैत्रिणींसोबत मस्ती करत होते. मी सातवीत असताना मला पहिल्यांदा पीरियड्स आले, तेव्हा मी न्यू जर्सीमध्ये होते. सुरुवातीला मला वाटलं मला कॅन्सर झाला आहे, आता मी मरणार, मी आईला हे कसं सांगू, तिला काय वाटेल, या भीतीने मी ग्रासले होते.”
