Last Updated:
Virat Kohli left for his home in Car : बसमधून उतरून हॉटेलमध्ये जाण्याऐवजी आपलं सामान घेऊन तिथं आधीच वाट पाहत असलेल्या एका खाजगी कारमध्ये बसून निघून गेला.
Indian Cricket Team : लंडन येथील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे सिरीजचा तिसरा आणि शेवटचा सामना रविवार, 19 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या मॅचसाठी भारतीय टीम लंडनमध्ये दाखल झाली. भारतीय क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या आगमनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, या प्रवासादरम्यान टीम इंडियाचा एक स्टार फलंदाज अचानक गायब झाला अन् हॉटेलमध्ये चेक इनच नाही केलं. त्यामुळे आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
खाजगी कारमध्ये बसून निघून गेला
टीम इंडियाच्या या प्लेयरने संघाच्या खेळाडूंसोबतच फ्लाईटने लंडनला आला आणि टीमच्या बसमधूनही त्याने प्रवास केला. परंतु, भारतीय संघ हॉटेलवर पोहोचताच सर्वांपेक्षा वेगळी भूमिका घेतली. तो बसमधून उतरून हॉटेलमध्ये जाण्याऐवजी आपलं सामान घेऊन तिथं आधीच वाट पाहत असलेल्या एका खाजगी कारमध्ये बसून निघून गेला. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून विराट कोहली आहे.
हॉटेलमध्ये न थांबता थेट घरी
मिळालेल्या रिपोर्टनुसार, विराट कोहली टीमसोबत हॉटेलमध्ये न थांबता थेट लंडन येथील आपल्या घरी गेला आहे. विराट गेल्या काही काळापासून त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन्ही मुलांसह लंडनमध्येच स्थायिक आहे. मॅचपूर्वी मिळालेल्या मोकळ्या वेळात तो आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी रवाना झाल्याचे बोलले जात आहे.
इंग्लंड दौऱ्यात विराटची कामगिरी
इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विराटसाठी निराशाजनक झाली होती आणि पहिल्या वनडे मॅचमध्ये तो स्वस्तात बाद झाला होता. मात्र, कार्डिफ येथे झालेल्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये किंग कोहलीने शानदार पुनरागमन करत 65 रन्सची उत्कृष्ट इनिंग खेळली. इंग्लंडविरुद्धच्या या शेवटच्या मॅचनंतर विराट कोहलीला क्रिकेटमधून मोठा ब्रेक मिळणार आहे. आता तो थेट 27 सप्टेंबरपासून वेस्टइंडिजविरुद्ध खेळताना दिसेल.
Mumbai,Maharashtra
IND vs ENG 3rd ODI : टीम इंडियाचा स्टार खेळाडू हॉटेलमधून गायब! एअरपोर्टपर्यंत सोबत होता पण… तिसऱ्या वनडेआधी काय घडलं?
