MP Merger : ठाकरे गटाचे 6 अन् ममता बॅनर्जींचे 20 बंडखोर खासदार, लोकसभा अध्यक्ष आज विलीनीकरणावर अंतिम निर्णय देणार?


मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. ठाकरे गटातून फुटून गेलेल्या सहा खासदारांच्या (MP Merger) शिंदे गटातील विलीनीकरणावर आज (शनिवारी, ता १८) लोकसभा अध्यक्ष निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरेंच्या पक्षातून शिवसेनेत गेलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार संजय दिना पाटील, खासदार संजय उर्फ बंडू जाधव, खासदार संजय देशमुख, खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासंदर्भातील याचिकेवर आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला निर्णय घेण्याची शक्यता आहे.(MP Merger)

17 जूनला या सर्व सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेत त्यांना शिंदे गटात विलीन होत असल्यास पत्र दिलं होतं. मात्र या विलीनीकरणाला मान्यता देऊ नये यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार आणि लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं होतं पत्र. या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष या 6 खासदारांच्या विलीनीकरणावर काय निर्णय घेतात?, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. (MP Merger)

ठाकरे गटाच्या सहा खासदारांसोबतच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधून फुटलेल्या 20 खासदारांच्या विलीनीकरणाच्या संदर्भामध्येही लोकसभा अध्यक्ष आजच निर्णय देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, तृणमूल काँग्रेसच्या 20 बंडखोर खासदारांनी आपला गट त्रिपुरातील ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) या पक्षात विलीन केला होता. त्यानंतर या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन एनडीए (NDA) सरकारला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. दोन्ही पक्षांच्या खासदारासंदर्भात आजच निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. काही कारणाने आज निर्णय झाला नाही, तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उद्या (रविवारी, ता १९) किंवा सोमवारी (ता. २०) निर्णय देण्याची शक्यता आहे. आजच्या निर्णयामुळे राष्ट्रीय राजकारणात अनेक घडामोडी होण्याची शक्यता आहे. निर्णय खासदारांच्या बाजूने लागल्यास एनडीए होणार आणखी मजबूत होणार असल्याचं बोललं जात आहे.(MP Merger)

6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? (Why did 6 MPs part ways with UBT Shivsena?)

पक्ष सोडण्यापूर्वी बंडखोर खासदारांनी मंजूर केलेल्या ठरावात, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरण होण्याबाबतच्या भीतीचा उल्लेख करण्यात आला आहे. या ठरावात म्हटले आहे की, पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीपासून भरकटला आहे आणि काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या उद्देशाने शिवसेनेची स्थापना करण्यात आली नव्हती. तसेच, तृणमूल काँग्रेसने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिल्याचा संदर्भ देत, भविष्यात ‘शिवसेना ठाकरे गट देखील काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते, अशी भीती या ठरावात व्यक्त करण्यात आली होती. परिणामी, पक्ष नेतृत्वावरील अविश्वासामुळे बंडखोर खासदारांनी वेगळी वाट धरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, बंडखोर खासदारांनी स्वतःला स्वतंत्र गट म्हणून घोषित केलेले नाही; त्यांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार, त्यांनी थेट शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, प्रसारमाध्यमांच्या वृत्तांमध्ये त्यांना ‘स्वतंत्र गट’ असे संबोधले जात असले तरी, फुटलेल्या खासदारांनी त्यांच्या ठरावात असा दावा करण्यात आला आहे की, ते शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन झाले आहेत.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *