Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 


Rahul Gandhi  डेहराडून : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेच्या स्थितीवर जोरदार हल्लाबोल केला. गांधी यांनी आकडेवारी जाहीर करत केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयावर हल्लाबोल केला.  गेल्या दहा वर्षात 152 पेपर लीक झाले याचा थेट आणि विपरीत परिणाम साडे सात कोटी विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर झाल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं. लज्जास्पद बाब म्हणजे या प्रकरणांमध्ये एकाही व्यक्तीला शिक्षा झाली नाही. या आकडेवारीतून स्पष्ट होतं की देशातील परीक्षा यंत्रणा खिळखिळी झालीय, असं राहुल गांधींनी म्हटलं.

टीव्ही, वृत्तपत्रातील पेपरफुटीच्या बातम्या हिमनग 

राहुल गांधी यांनी पेपर फुटीला महारोग असं म्हटलं. टीव्ही आणि वृत्तपत्रात येणारी पेपर फुटीची प्रकरणं हिमनगाचं टोक आहे. हा धंदा खूप खोलवर रुजलेला असून काळा असल्याची टीका राहुल गांधी यांनी केला. देशातील विविध राज्यांच्या भरती परीक्षा आणि देशातील  नीट सारख्या मोठ्या परीक्षांची  खुलेआम विक्री होत आहे, त्याचे रेटकार्ड निश्चित करण्यात आले आहेत. टेलीग्राम आणि सिग्नल सारख्या अॅप चा वापर करुन हा काळा धंदा सुरु आहे. या इकोसिस्टीमध्ये कोचिंग सेंटर, पेपर सेट करणारे लोक आणि काही मोठे अधिकारी यात सहभागी असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

सरकारच्या संवेदनहीनतेवर देखील राहुल गांधी यांनी टीका केली.  राहुल गांधी म्हणाले मॅन्युफॅक्चरिंग, आयटी ,उद्योजकता आणि खासगी क्षेत्रातील नोकऱ्या कमी होत आहेत. या स्थितीत युवकांकडे चांगलं आयुष्य जगण्यासाठी सरकारी नोकरी ही शेवटची आशा राहते. मात्र, या मार्गावर काटे पसरले आहेत. 

राहुल गांधी यासंदर्भात उदाहरण देताना म्हणाले की एक कुटुंब त्यांच्या मुलाच्या पाच वर्षांच्या तयारीसाठी जवळपास 9 लाख रुपयांचा खर्च करते. देशातील जवळपास 9 कोटी तरुण सरकारी नोकरीच्या रांगेत आहेत मात्र नोकऱ्या 6 लाख आहेत. म्हणजेच 150 उमेदवारांपैकी एकाच उमेदवाराला नोकरी मिळेल, तिथं देखील पेपरफुटीचा डाग लागतो, असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात रिया कुमारी या 23 वर्षीय विद्यार्थिनीच्या नावाचा उल्लेख केला. जिनं नीट पेपरफुटीच्या बातमीनं डिप्रेशनमध्ये जात जीवन संपवलं. रियाचे वडील रमेश बाल राहुल गांधींसोबत मंचावर उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले की हा फक्त सरकारी बेजबाबदारपणा नसून एका कुटुंबाच्या वर्षांच्या मेहनतीचा अपमान आहे. 

राहुल गांधी यांनी डेहराडूनच्या सभेत देशातील सरकारला केंद्रित व्यवस्थेऐवजी विद्यार्थी केंद्री व्यवस्थेकडे जावं लागेल, असं म्हटलं. आधुनिक टेस्टिंग मॉडेल सॅट, जीमॅट सारख्या सुरक्षित पर्यायांचा वापर करणं आवश्यक असल्याचं म्हटलं. नव्या व्यवस्थेमुळं एकाच वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रश्नांचे सेट मिळतील. नफा मिळवणाऱ्या खासगी कंपन्यांना आऊटसोर्स करुन सरकार जबाबदारी झटकू शकत नाही. विद्यापीठांचे कुलगुरू आणि परीक्षा यंत्रणांचे प्रमुख राजकीय पक्षांशी संबंधित नसावेत, असंही राहुल गांधी म्हणाले.

हेदेखील वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *