खेडमध्ये गुरुकुलात अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार, भगवान कोकरे महाराजवर गुन्हा दाखल


Khed, Ratnagiri Crime: खेड तालुक्यातील लोटे येथील आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुलमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भगवान कोकरे महाराज आणि प्रितेश कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

minor girl assault in warkari gurukul ratnagiri lote
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रत्नागिरी: खेड तालुक्यातील लोटे येथील “आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल” येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात भगवान कोकरे महाराज आणि त्यांचे सहकारी प्रितेश प्रभाकर कदम यांच्या विरोधात भारतीय दंडसंहिता तसेच पोक्सो अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणी खेड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी मागील काही काळापासून गुरुकुलात आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी राहत होती. यावेळी गुरुकुलातील प्रमुख असलेल्या भगवान कोकरे महाराज यांनी अनेकदा तिच्याशी अश्लील वर्तन केले. तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. सुरुवातीला ही घटना घडल्यानंतर पीडीतेने गुरुकुलातीलच एका सदस्याला घटना सांगितली असतं त्याने याबाबत कुठे काही बोलू नकोस महाराजांची सामाजिक व राजकीय ओळख असून तिला गप्प राहण्यास सांगत धमकावले. तसेच जर कोणाला काही सांगितले तर कुटुंबात आणि समाजात तुझी बदनामी होईल असेही तिला सांगितल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.
Maharashtra Timesभय इथले संपत नाही, ‘तो’ बिंधास्त आला, गाडीतून पैशांची बॅग काढली अन्…, कोल्हापुरात धक्कादायक प्रकार
पीडितेच्या बाबतीत वारंवार अशा प्रकारच्या प्रकारच्या घटना घडू लागल्या आणि अखेर हा सर्व प्रकार किती तिच्या कुटुंबातील सदस्यांना समजला. कुटुंबीयांनी नंतर पोलिस ठाण्यात धाव घेतली व या संदर्भात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरुन पोलीसांनी संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकाराने समाजात आणि धार्मिक संस्थांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली असून अनेक स्थानिक आणि सामाजिक कार्यकर्ते यावेळी आरोपीची गंभीर चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

सगळं लुटलं, स्वप्न उद्ध्वस्त… सराफाच्या फसवणुकीनं महिलांच्या डोळ्यात अश्रू!

याप्रकरणी खेड पोलिसांनी कोकरे महाराजांवर विनयभंग व पोस्कोचा गुन्हा दाखल केला आहे. खेड पोलिसांकडून भगवान कोकरे याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अधिक तपास खेडचे उपविभागीय अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक अहिरे करत आहेत.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा