Last Updated:
विनायक राऊत यांच्या सूनबाई गिरीजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीत शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ तसेच अंधश्रद्धेच्या नावाखाली झालेल्या प्रकारांचा उल्लेख आहे. त्याच प्रकरणाच्या पुढील तपासासाठी आता या ५ जणांना बोलावण्यात आल्याची माहिती आहे.
भरत केसरकर, प्रतिनिधी, सिंधुदुर्ग : फिरोज बाबा प्रकरणात आता सिंधुदुर्गातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ठाणे शहरातील कापूरबावडी पोलिसांनी आता पुढील चौकशीसाठी काही जणांना समजपत्र बजावले आहे. यामध्ये सिंधुदुर्गातील सावंतवाडीचे ठाकरे सेनेचे रुपेश राऊळ,कोलगावचे अपक्ष जि.प.सदस्य मायकल डिसोझा,अमित नाईक, बाळा पेडणेकर,संजय परब या पाच नावांचा समावेश आहे.
या सर्वांना BNSS च्या कलम 179 अन्वये चौकशीसाठी हजर राहण्याचे समजपत्र ठाणे पोलिसांनी दिले आहे. BNSS 179 म्हणजे तपासाच्या अनुषंगाने व्यक्तीला हजर राहण्याचा लेखी आदेश असतो.
गिरीजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीत शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ तसेच अंधश्रद्धेच्या नावाखाली झालेल्या प्रकारांचा उल्लेख आहे. त्याच प्रकरणाच्या पुढील तपासासाठी आता या ५ जणांना बोलावण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणावरून आधीच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब आणि ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता थेट समजपत्र बजावल्याने या वादाला आणखी नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
राऊतांच्या सूनबाई गिरिजा राऊत यांचे नेमके काय आरोप आहेत?
संतती प्राप्तीसाठी (मूल होण्यासाठी) सासरच्या लोकांनी भोंदूबाबांच्या सांगण्यावरून अमानुष छळ केला. आपल्याला वारंवार गोमूत्र पिण्यास भाग पाडले आणि विविध अघोरी कृत्य केले, असा आरोप गिरीजा यांनी सासरच्या लोकांविरुद्ध केला.
पती शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नसतानाही ही गोष्ट लपवून लग्न लावून दिले. लग्नानंतर पतीने वैवाहिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ केली आणि याबाबत जाब विचारल्यावर मारहाण आणि छळ केला. लग्न करण्यापूर्वी मुंबईत मोठा बंगला असल्याची खोटी माहिती दिली, पण प्रत्यक्षात झोपडपट्टीतील घरात ठेवले. तसेच त्यांची खाजगी नोकरी सोडायला लावून त्यांचे आर्थिक खच्चीकरण केले.
Sindhudurg,Maharashtra
सिंधुदुर्गच्या फिरोज बाबा प्रकरणात नवा ट्विस्ट, राऊतांच्या सुनेने केलेल्या तक्रारीवरून ५ जणांची चौकशी
