Aamir Khan On Sonam Wangchuk Hunger Strike: प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) सध्या दिल्लीतील (New Delhi) जंतर-मंतरवर (Jantar Mantar) उपोषणाला बसलेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Education Minister Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) समर्थनार्थ सोनम वांगचुक उपोषण करत आहेत. सोनम वांगचुक यांनी गेल्या 20 दिवसांपासून अन्नाचा एक कणही घेतलेला नाही, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जातेय.
सोनम वांगचुक यांचं उपोषण (Sonam Wangchuk Hunger Strike)
गेल्या काही दिवसांत, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोनम वांगचुक यांचं उपोषण आणि त्यामुळे ढासळलेली प्रकृती याबाबत प्रतिक्रिया दिली. या शास्त्रज्ञानं आपलं उपोषण मागे घ्यावं अशी सर्वांची इच्छा आहे. कारण आंदोलनापेक्षा त्यांची प्रकृती आणि सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे, असं त्यांना वाटतंय. दरम्यान, ‘3 इडियट्स’ (3 Idiots) सिनेमातील भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ओमी वैद्य यांचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, त्यांना ‘रँचो’ (सोनम वांगचुक) यांना मृत्यूच्या दारात पाहायचं नाही.
‘3 इडियट्स’ सिनेमात आमिर खाननं साकारलेलं ‘रँचो’ हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याचं बोललं जातं. आता सुपरस्टार आमिर खाननंही या विषयावर भाष्य केलंय. अलिकडेच त्यांनी ‘ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट’ला भेट दिलीय, जिथे त्यांना सोनम वांगचुक यांच्याबद्दल विचारण्यात आलं. यावेळी अभिनेत्यानं या शास्त्रज्ञाच्या प्रकृतीबद्दल आपली चिंता व्यक्त केलीय.
Today at @BFI I asked Mr Amir Khan about @Wangchuk66 and his fast. Here is his response: @abhijeet_dipke @CJP_2029 @Cockroachisback @SauravDassss pic.twitter.com/jkeKFssrDX
— nabanita sircar (@sircarnabanita) July 16, 2026
“फुंसुक वांगडू आणि सोनम वांगचुक यांचा काही संबंध नाही…” (Aamir Khan On Sonam Wangchuk)
‘3 इडियट्स’ (3 Idiots) या आमिर खान स्टारर सिनेमाची कथा सोनम वांगचुक यांच्यावर आधारित आहे का? या प्रश्नावर बोलताना आमिर खान म्हणाला की, “नाही, ते खरं नाही… उलट, हा एक गैरसमज आहे. आम्ही जेव्हा हा सिनेमा बनवत होतो, तेव्हा मला सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. मी नुकताच ‘चतुर’ (ओमी वैद्य) याचा एक व्हिडीओ पाहिला, ज्यात त्यानं तसं म्हटलंय… पण ते तसं नाही, त्याचा गैरसमज झालाय. चतुरला कदाचित तसं वाटलं असेल, पण मला हे स्पष्ट करायचंय की, राजू (राजकुमार हिरानी), अभिजात जोशी (ज्यांनी ‘3 इडियट्स’चं लेखन केलंय) किंवा मी, आमच्यापैकी कोणालाही त्या वेळी सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती…”
“सोनम वांगचुक यांच्या कामाचा आदर करण्यासाठी ‘3 इडियट्स’मधील पात्र त्यांच्यावर आधारित असण्याची गरज नाही…”
पुढे बोलताना आमिर खाननं सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत भाष्य केलंय. आमिर खान म्हणाला की, “तरीही, सोनम वांगचुक जे काम करत आहेत, ते उत्कृष्ट आणि खरोखरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामाचा आदर करण्यासाठी ‘3 इडियट्स’मधील पात्र त्यांच्यावर आधारित असण्याची गरज नाही. सोनम वांगचुक यांनी स्वतः यापूर्वी स्पष्ट केलंय की, सिनेमातील पात्र त्यांच्यावर आधारित नव्हतं. मला फक्त वस्तुस्थिती स्पष्ट करायची होती…”
“आम्हा सर्वांनाच त्यांच्या आरोग्याची आणि आयुष्याची काळजी वाटतेय. हे आंदोलन लवकरात लवकर शांततेनं संपेल आणि सोनम वांगचुक आपलं उपोषण मागे घेऊन स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतील…”, असं सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर चिंता व्यक्त करताना आमिर खान म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :