Virat-Gambhir Rift : मला असं वाटत नाही की, त्या दोघांना..विराट-गंभीर बोलत नाहीत, या चर्चांवर अखेर टीम इंडियाच्या कोचने सोडलं मौन – Marathi News | Team India Batting Coach Sitanshu Kotak break silence on virat kohli gautam gambhir rift rumours india vs england odi series


Virat-Gambhir Rift Rumours : टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्यातील संबंध नेहमीच क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय राहिले आहेत. इंग्लंड मध्ये सुरु असलेल्या वनडे सीरीजमध्ये दोघांमधील बोलणं पूर्णपणे बंद झाल्याच काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. एजबेस्टन येथे प्रॅक्टिस सेशनमध्ये दोन्ही दिग्गज परस्परांशी एक शब्दही बोलले नाहीत, त्यामुळे गौतम गंभीर आणि विराट कोहली एकमेकांशी बोलत नाहीत अशी अफवा पसरली. आता या सर्व बातम्या आणि अफवांवर टीम इंडियाचे फलंदाजी कोच सितांशु कोटक बोलले आहेत. नेमकं सत्य काय आहे ते त्यांनी सांगितलं.

कार्डिफमध्ये दुसरा वनडे सामना झाल्यानंतर टीम इंडियाचे फलंदाजी कोच सिंताशु कोटक पत्रकार परिषदेला सामोरे गेले. त्यांनी या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या. पत्रकार परिषदेत सितांशु कोटक यांना विराट कोहली आणि हेड कोच गौतम गंभीर यांच्यातील मतभेदांबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी हसून उत्तर दिलं की, “विराट आणि गौतममध्ये आजच कमीत कमी 10 वेळा बोलणं झालं आहे. मला असं वाटत नाही की, त्या दोघांना परस्परांशी बोलण्यासाठी कुठल्या तिसर्‍या व्यक्तीची गरज आहे”

कोहलीने गंभीर यांना काय संदेश पाठवलेला?

सितांशु कोटक म्हणाले की, “मला हे समजत नाही की अशा आधारहीन अफवा कुठून पसरतात?. ड्रेसिंग रुममधील वातावरण एकदम चांगलं आहे आणि दोघांमध्ये सर्वकाही आलबेल आहे असं ते म्हणाले” कोटक यांनी कार्डिफ वनडेचं उदहारण देताना विराट आणि गंभीरमध्ये योग्य समन्वय असल्याचं सिद्ध केलं. कोटक म्हणाले की, “विराट मैदानात फलंदाजी करत असताना त्याने क्रीजमधून ड्रेसिंग रुम आणि हेड कोच गौतम गंभीर यांना एक महत्वाचा संदेश पाठवला होता” कार्डिफचा हा पीच स्लो आहे आणि इथे शॉर्ट-पिच चेंडू सहज बॅटवर येत नाहीयत असं कोहलीने पाठवलेल्या संदेशात म्हटलं होतं.

पण या सामन्यात विराटने चांगली बॅटिंग केली

सध्या वनडे सीरीज सुरु आहे. पहिल्या वनडेत विजय मिळाल. दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला 4 विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. पण या सामन्यात विराटने चांगली बॅटिंग केली. त्याने 66 चेंडूंचा सामना करताना 65 धावा केल्या. यात 8 चौकार होते. विराट क्रीजवर असेपर्यंत टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारेल असं चित्र होतं. पण तो बाद होताच टीम इंडियाचा डाव ढेपाळला. आता मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *