Petrol-Diesel Rate : पेट्रोलचे रेट वाढले की मिळाला दिलासा ? शुक्रवारची सकाळीच मोठी अपडेट – Marathi News | Fuel Price Update July 17: No Change in Petrol Diesel, Rising Crude and Export Duty Impact


शुक्रवारी सकाळी पेट्रोल-डिझेल रेट्स काय ?Image Credit source: social media

Petrol-Diesel Rate Today on July 17 : आज, शुक्रवारी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सरकारी तेल विपणन कंपन्या – इंडियन ऑइल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL)ने आज सकाळी ६ वाजता जाहीर केलेल्या नवीन दरपत्रकानुसार इंधनाच्या किमती पूर्वीच्या पातळीवरच कायम ठेवण्यात आल्या आहेत. इंधनाचे दर जैसे थे असल्याने वाहनधारकांना सलग आणखी एक दिवस दरवाढीपासून दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर ₹102.12, तर डिझेलचा दर ₹95.20 इतकाच कायम आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल 111.21 रुपये आणि डिझेल 97.83 रुपये दराने मिळतंय.

गाझियाबादमध्ये पेट्रोल ₹101.88 प्रति लिटर आणि डिझेल ₹95.36 प्रति लिटर दराने विकले जात आहे. नोएडामध्येही पेट्रोलचा दर ₹102.12 प्रति लिटर असून डिझेल ₹95.56 प्रति लिटर या दराने उपलब्ध आहे. देशातील इतर अनेक शहरांमध्येही इंधनाचे दर स्थिर राहिल्याचे दिसून आलं.

प्रमुख शहरातील इंधनाचे दर

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे चिंता

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या बाजारभावावर होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील ब्रेंट क्रूडची किंमत गेल्या आठवडाभरात सुमारे 1.1 टक्क्यांनी वाढून 85.08 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. त्याचवेळी अमेरिकन WTI क्रूड वायद्याची किंमतही वाढून 79.49 डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावली आहे. या वाढत्या दरांमुळे भारतासारख्या कच्च्या तेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या देशांसाठी इंधन खर्चात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारचा निर्णय; निर्यात शुल्कात वाढ

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा विचार करून केंद्र सरकारने डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) वरील निर्यात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला. नव्या अधिसूचनेनुसार डिझेलवरील निर्यात शुल्क प्रति लिटर 15.50 करण्यात आले असून, ATF वरील लेव्ही 7.50 रुपयांवरून वाढवून ते 14.50 रुपये प्रति लिटर करण्यात आलं. हे सुधारित दर काल, म्हणजेच गुरूवार 16 जुलैपासून लागू झाले. कच्च्या तेलाची किंमत 85 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्यामुळे आणि निर्यात शुल्कात वाढ झाल्यामुळे सरकारी तेल विपणन कंपन्यांच्या नफ्याच्या मार्जिनवर पुन्हा दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या किरकोळ इंधन दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसला, तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींची दिशा आणि भू-राजकीय परिस्थिती यावर आगामी काळातील पेट्रोल-डिझेलच्या दरांचा निर्णय मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस जागतिक तेलबाजारातील घडामोडींवर वाहनधारकांसह उद्योगक्षेत्राचेही लक्ष लागून राहणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *