शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान


ठाणे : मुंबईतील (Mumbai) चेंबूर परिसरात एका स्कुल बसवर झाड पडून झालेल्या दुर्घटनेत एका निष्पाप शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेवरुन आजच मुंबई महापालिका सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते. त्यातच, मीरा रोड (Mira road) पूर्व येथील जेपी नॉर्थ सोसायटीत आज सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पावरील विशाल क्रेन अचानक तुटून सोसायटी परिसरात कोसळल्याने 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात (Accident) परिसरात उभ्या असलेल्या सुमारे 15 ते 16 वाहनांचेही मोठे नुकसान झाले असून, संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

क्रेन कोसळताच परिसरात मोठा आवाज झाला आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. स्थानिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. मात्र, जखमींची अधिकृत संख्या अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.

दरम्यान, या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून, क्रेन कोसळण्यामागे तांत्रिक बिघाड, निष्काळजीपणा किंवा सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन कारणीभूत होते का, याचा तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले असून, या घटनेमुळे बांधकाम प्रकल्पांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हेही वाचा

महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *