इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीची वसुली, अर्धशतक ठोकत दिलं उत्तर – Marathi News | Virat Kohli scored a half century in the second ODI against England


इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीची वसुली, अर्धशतक ठोकत दिलं उत्तरImage Credit source: BCCI Twitter

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहली फक्त 5 धावा करून बाद झाला होता. त्यामुळे लयीत नसल्याचं बोललं जात होतं. पण दुसर्‍या सामन्यात त्याने सर्व अंदाज आणि बातम्या खोडून काढल्या आहे. विराट कोहलीने या सामन्यात सावध सुरूवात केली. पहिले चार चेंडू निर्धाव घालवले आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारून धावांना सुरूवात केली. विराट कोहली या सामन्यात किती धावांपर्यंत पोहोचते? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलं होतं. पण विराट कोहलीने अर्धशतक ठोकलं आणि त्याच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. विराट कोहलीने टीकाकारांना बॅटने चोख उत्तर दिलं असून तोंडं बंद केली आहेत.

विराट कोहली 49 चेंडूत 49 धावांवर खेळत होता. त्याने सॅम करनच्या चेंडूवर चौकार मारला आणि अर्धशतक साजरं केलं. त्याच्या चौकारानंतर कार्डिफच्या मैदानात त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहलीची ही 14 वी 50 हून अधि धावांची खेळी आहे. यात तीन शतकांचा समावेश आहे. यासह विराट कोहली व्हिव्ह रिचर्ड्ससोबत संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आणि कुमार संगकारापेक्षा एका क्रमांकाने मागे आहे. विराट कोहलीची मागच्या 9 वनडे सामन्यातील खेळी पाहिली तर त्याचा फॉर्म काय आहे ते दिसून येते. 74*, 135, 102, 65*, 93, 23, 124,5 आणि 65 धावा केल्या आहे.

विराट कोहलीने 66 चेंडूत 65 धावांची खेळी केली आणि बाद झाला. त्याने या खेळीत 8 चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट हा 98.48 चा होता. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर आदिल राशीदने विराटचा झेल पकडला आणि त्याचं शतकाचं स्वप्न भंगलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *