नाश्त्यासाठी काहीतरी हटके आणि वेगळं बनवाचयं? तर दुधी भोपळ्यापासून बनवा ‘हे’ 3 चविष्ट पदार्थ – Marathi News | Want to make something unique and different for breakfast Make these 3 delicious dishes using bottle gourd


तुम्हाला जर नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, ओट्स आणि बेसनाचा चिला खाऊन कंटाळा आला असेल, तर या वेळी नाश्त्यात काहीतरी हटके पदार्थ करून पहा. बहुतेक लोकांना हलका आणि पोटभरीचा नाश्ता आवडतो. अशावेळी तुम्ही दुधी भोपळ्यापासून बनवलेला नाश्ता एक उत्तम पर्याय ठरू शकतो. दुधी भोपळ्यापासून विविध प्रकारच्या चविष्ट आणि आरोग्यदायी नाश्त्याचे पदार्थ सहजपणे बनवता येतात.

तुम्ही दुधी भोपळीची भाजी अनेकदा खाल्ली असेल, पण त्यापासून बनवलेले बन डोसे, वडी आणि सँडविच तुम्ही कदाचित कधीच करून पाहिले नसतील. मास्टरशेफ पंकज भदोरिया यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर याच्या रेसिपी शेअर केल्या आहेत. तुम्ही त्या घरी सहज बनवू शकता. चला तर मग आजच्या आपण दुधी भोपळ्यापासून नाश्त्याचे पदार्थ कसे बनवता येतील ते जाणून घ्या.

दुधी भोपळ्यापासून बनवा बन डोसा

साहित्य

दुधी भोपळा – 1 किसलेला

रवा – 1 कप

दही- 1/4 कप

मीठ- चवीनुसार

पाणी- गरजेनुसार

तेल- 1½ चमचा

हिंग- 1½ चमचा

मोहरी- 1 चमचा

हिरवी मिरची- 2 बारीक कापलेली

चणा डाळ- 2 चमचा

अदरक- 1 चमचा

कांदा- 1 बारीक चिरलेला

कढीपत्ता- 4 ते 5 पानं

तीळ- 1 चमचा

बेकिंग सोडा- 1 चमचा

बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम दुधी भोपळा किसून घ्या. आता त्यात रवा, दही, मीठ आणि गरजेनुसार पाणी टाका आणि मिश्रण चांगले तयार करा. आता हे मिश्रण सुमारे 5 मिनिटे झाकून बाजूला ठेवा. आता एका कढईत तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी, हिरवी मिरची, चणा डाळ, आले, कांदा आणि कढीपत्ता टाका. तयार केलेली फोडणी मिश्रणामध्ये मिक्स करून आता त्यात खाण्याचा सोडा टाका व चांगले मिक्स करा. आता एक लहान पॅन घ्या आणि त्यात मिश्रण टाका. एका बाजूने शिजल्यावर ते पलटा आणि दुसऱ्या बाजूने शिजवून घ्या. अशाप्रकारे बन डोसा तयार होईल.

दुधी भोपळ्याचे सँडविच

साहित्य

दुधी भोपळ्याची पेस्ट- 1½ कप

आलं- 1 तुकडा

2 हिरव्या मिरच्या

मीठ- चवीनुसार

रवा- 1 कप

दही- 1/2 कप

1 छोटा चमचा बेकिंग सोडा

बनवण्याची पद्धत

दुधी भोपळ्याला अदरक सोबत बारीक वाटून घ्या. पेस्टमध्ये दही, मीठ आणि रवा टाकून चांगले एकजीव करा. हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात बेकिंग सोडा टाका. सँडविच मेकर गरम करून त्याला हलके तेल लावा. त्यात हे मिश्रण टाका आणि शिजू द्या. अशाप्रकारे तुम्हाला ब्रेडशिवाय सँडविच मिळेल, जे तुम्ही चटणी किंवा केचपसोबत खाऊ शकता.

दुधी भोपळ्याची वडी

साहित्य

दुधी भोपळा- 2 कप

बेसन- 1½ कप

तांदळाचे पीठ- 1½ कप

जिरं- 1 चमचा

ओवा- 1½ चमचा

गरम मसाला- 1½

तीळ- 2 चमचे

मीठ- चवीनुसार

हिरव्या मिरच्या- 3

कोथिंबीर- एका वाटी बारीक चिरलेली

आलं लसूण पेस्ट- 1 चमचा

लिंबाचा रस-1 चमचा

तेल- 2 चमचे

बनवण्याची पद्धत

दुधी भोपळ्याचे वडे बनवण्यासाठी प्रथम दुधी भोपळा किसून घ्या. त्यात बेसन आणि तांदळाचे पीठ मिक्स करा. आता या पीठात जिरं, ओवा, गरम मसाला, तीळ, मीठ, हिरव्या मिरच्या, हिरवी कोथिंबीर, अदरक लसून पेस्ट, लिंबाचा रस आणि 2 चमचे तेल टाकून सर्व मिश्रण चांगले एकजीव करा. आता हे मिश्रण स्टीमरमध्ये ठेवा. सुमारे 15 मिनिटे शिजल्यानंतर ते बाहेर काढा. थंड झाल्यावर त्याचे तुकडे करा. आता हे वडी तेलात सोडून हलके तळून घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *