Last Updated:
कमी वयातच अनेकांचे केस पांढरे होतात. सुरुवातीपासूनच योग्य ती काळजी घेतली तर केस पांढरे होण्याचं प्रमाण रोखता येऊ शकतं. प्रसिद्ध त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. जुश्या भाटिया सरीन यांनी व्हिडिओद्वारे केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी चार सोपे उपाय सांगितले आहेत.
मुंबई : केस पांढरे होणं म्हणजे वृद्धत्वाचे संकेत मानले जातात. पण काही जणांचे केस लवकर पांढरे होतात. अशावेळी काय करायचं याविषयी त्वचाविकारतज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली.
कमी वयातच अनेकांचे केस पांढरे होतात. सुरुवातीपासूनच योग्य ती काळजी घेतली तर केस पांढरे होण्याचं प्रमाण रोखता येऊ शकतं. प्रसिद्ध त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. जुश्या भाटिया सरीन यांनी व्हिडिओद्वारे केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी चार सोपे उपाय सांगितले आहेत.
केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी करता येतील असे उपाय –
अँटीऑक्सिडंट्स – केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी, डॉक्टर सर्वप्रथम आहारात अँटीऑक्सिडंट्स असलेल्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. यासाठी, त्वचारोगतज्ज्ञांनी दररोज अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध असलेले पदार्थ उदाहरणार्थ पालक, बेरीज, अंडी आणि सुकामेव खाण्याचा सल्ला दिला आहे.
हे पदार्थ शरीरातील ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’ कमी करण्यासाठी मदत करतात. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, तेव्हा केसांच्या रंगद्रव्यासाठी म्हणजेच पिगमेंटेशनसाठी जबाबदार असलेल्या पेशी कमकुवत होतात आणि केस अकाली पांढरे होऊ लागतात; अशा वेळी अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त पदार्थ फायदेशीर ठरू शकतात.
योग्य हेअर सीरमचा वापर – डॉक्टरांच्या मते, ज्याप्रमाणे सूर्याची किरणं आपल्या त्वचेचं नुकसान करतात, त्याचप्रमाणे ती केसांवरही परिणाम करतात. सूर्याच्या हानिकारक अतिनील (UV) किरणांमुळे केसांमधील प्रथिनांचं नुकसान होऊ शकतं, ज्यामुळे केस अकाली पांढरे होऊ शकतात. म्हणूनच, अतिनील किरणांपासून संरक्षण देणारे हेअर सीरम वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दररोज उन्हात बाहेर जात असाल, तर केस झाकून ठेवणं किंवा हेअर सीरमचा वापर करणं फायदेशीर ठरू शकतं.
धूम्रपान सोडा – धूम्रपानाचा केसांवर थेट परिणाम होतो. त्वचाविकार तज्ज्ञांच्या मते, धूम्रपानामुळे शरीरात ‘ऑक्सिडेटिव्ह डॅमेज’ म्हणजेच पेशींचं होणारं नुकसान वाढतं. याचा परिणाम केसांच्या मुळांवर होतो, ज्यामुळे केस वेगानं पांढरे होऊ लागतात.
सकस आहार, केसांची योग्य निगा आणि इतर उपाययोजना करूनही केस पांढरेच राहत असतील, तर ते लपवण्यासाठी अमोनिया-मुक्त हेअर कलरचा वापर केला जाऊ शकतो. कोणताही हेअर कलर लावण्यापूर्वी त्वचाविकारतज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे.
Mumbai,Maharashtra
Hair Care : केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी काय करायचं ? त्वचाविकारतज्ज्ञांनी सांगितलेत महत्त्वाचे उपाय
