537 रन, 51 सिक्स… T20 क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात मोठा रन चेस, मध्यरात्री आलं पूरन-पोलार्ड-स्मिथचं वादळ! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

537 रन, 51 सिक्स आणि 3 शतकं, टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात मोठा रन चेसचा विक्रम झाला आहे.

537 रन, 51 सिक्स... T20 क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात मोठा रन चेस, मध्यरात्री आलं पूरन-पोलार्ड-स्मिथचं वादळ!
537 रन, 51 सिक्स… T20 क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात मोठा रन चेस, मध्यरात्री आलं पूरन-पोलार्ड-स्मिथचं वादळ!

मुंबई : 537 रन, 51 सिक्स आणि 3 शतकं, टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात मोठा रन चेसचा विक्रम झाला आहे. मेजर क्रिकेट लीग (एमएलसी) 2026 च्या एलिमिनेटर-1 च्या सामन्यात हा रेकॉर्ड झाला. ऑकलंडमध्ये झालेल्या या सामन्यात टी-20 क्रिकेटची सगळी रेकॉर्ड उद्ध्वस्त झाली. एमआय न्यूयॉर्कने या सामन्यात पहिले बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 266/9 रन केले. या आव्हानाचा पाठलाग वॉशिंग्टन फ्रीडमने फक्त 18.4 ओव्हरमध्ये 270/4 बनवून केला आणि 6 विकेटने सामना जिंकला. दोन्ही टीमनी मिळून 537 रन केले आणि 51 सिक्स मारल्या. टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील हे सगळ्यात यशस्वी रन चेस आहे.

याआधी हा विक्रम पंजाब किंग्सच्या नावावर होता. आयपीएल 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पंजाबने 265 रनच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला होता. तर तिसऱ्या क्रमांकावरही पंजाब किंग्सच आहे, पंजाबने आयपीएल 2024 मध्ये केकेआरविरुद्ध 262 रन चेस केले होते.

266 रन करूनही पराभव

निकोलस पूरनने फक्त 31 बॉलमध्ये शतक ठोकून एमएलसी च्या इतिहासातील सगळ्यात जलद शतक पूर्ण केलं. पूरनने 106 रनची वादळी खेळी केली. याचसोबत कायरन पोलार्डने 25 बॉलमध्ये 64 रन ठोकले आणि टी-20 करियरमधील एक हजार सिक्सही पूर्ण केलं. याचसोबत क्विंटन डिकॉकनेही अर्धशतक ठोकलं.

13 ओव्हरमध्ये एमआय न्यूयॉर्कचा स्कोअर 211/3 एवढा होता, तेव्हा टीमचा स्कोअर 300 रन होईल असं वाटत होतं, पण रचिन रवींद्रने शेवटच्या ओव्हरमध्ये 4 विकेट घेऊन एमआय न्यूयॉर्कला 266 रनवर रोखलं.

10 रनवर दोन विकेट, मग आक्रमण

267 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना वॉशिंग्टन फ्रीडमची सुरूवात खराब झाली. फक्त 10 रनवर त्यांच्या 2 विकेट गेल्या. शाकिब अल हसनने नव्या बॉलने सुरूवातीलाच दोन विकेट घेतल्या. यानंतर एंड्रीस गॉस आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने इतिहास घडवायला सुरूवात केली. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी 89 बॉलमध्ये 241 रन केले. टी-20 च्या इतिहासातील ही संयुक्तरित्या दुसरी सगळ्यात मोठी पार्टनरशीप आहे. गॉसने 56 बॉलमध्ये 132 तर स्मिथने 49 बॉलमध्ये नाबाद 110 रन ठोकले. दोघांनीही फक्त 40-40 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं.

एकाच सामन्यात 3 शतकं

पुरुषांच्या टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एका मॅचमध्ये तीन खेळाडूंनी शतक ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे. निकोलस पूरनने 106, एंड्रीस गॉसने 132 आणि स्टीव्ह स्मिथने नाबाद 110 रन केल्या.

एकाच सामन्यात तुटली इतकी रेकॉर्ड

एकाच सामन्यात 537 रन

दोन्ही टीमनी मिळून मारल्या 51 सिक्स

267 रनचा यशस्वी पाठलाग

एकाच सामन्यात 3 शतकं

एंड्रीस गॉस- एमएलसीमध्ये शतक करणारा पहिला अमेरिकन खेळाडू

कायरन पोलार्ड- टी-20 क्रिकेटमध्ये 1 हजार सिक्स पूर्ण

गॉस-स्मिथची 241 रनची पार्टनरशीप- टी-20 इतिहासातील संयुक्तरित्या दुसरी सगळ्यात मोठी

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

537 रन, 51 सिक्स… T20 क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात मोठा रन चेस, मध्यरात्री आलं पूरन-पोलार्ड-स्मिथचं वादळ!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *