Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा – Marathi News | Why leave politics bollywood actor Paresh rawal now reveles impact of twitter on health interview with Vicky lalwani


अभिनेते परेश रावल हे हिरो नाहीत, पण त्यांनी ज्या भूमिका केल्या त्यातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वत:च एक वेगळं स्थान निर्माण केलं. मागच्या अनेक दशकापासून ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. विनोदी अभिनेता, खलनायक, मित्र, वडिल अशा वेगलेगळ्या रोल्समधून त्यांनी स्वत:ची एक छाप उमटवली. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर कसदार भूमिका सुद्धा साकारल्या. परेश रावल ही व्यक्ती फक्त अभिनय क्षेत्रापुरती मर्यादीत नाही. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर सुद्धा परखडपणे भाष्य केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर मांडलेल्या मतांमुळे काहीवेळा वाद सुद्धा निर्माण झाले. ‘माझ्या ऑनलाइन उपस्थितीमुळे चांगल्यापेक्षा वाईट जास्त होत होतं’ असं परेश रावल म्हणाले.

नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना परेश रावल त्यांच्या स्वभावाबद्दल व्यक्त झाले. काही टि्वटसबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ‘टि्वटरवर सक्रीय राहण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर जास्त परिणाम होत होता’ असं ते म्हणाले. विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या स्वभावाबद्दल बोलताना परेश रावल म्हणाले की, ” बघा मला कुठून काही मिळवायचं नाहीय. मला कोणाला खाली पाडायचं नाहीय. मला कुठला लोभ नाहीय. माझ्याकडे जे काही आहे, मला असं वाटतं देवाने मला भरपूर दिलय. त्यामुळे मला कुठला लोभ नाही. म्हणून मी स्पष्टवक्ता आणि प्रामाणिक आहे”

राजकारण का सोडलं?

परेश रावल यांनी राजकारण का सोडलं, त्या बद्दलही सांगितलं. ते 2014 साली गुजरातच्या अहमदाबादमधून निवडून लोकसभेवर गेले होते. पण 2019 साली ते राजकारणातून बाहेर पडले. विकी लालवानीच्या पॉडकास्टमध्ये ते बोलत होते. राजकारणात खूप समर्पण भावनेची गरज असते. अभिनय कायम ठेऊन राजकारण शक्य नव्हतं. म्हणून राजकारणातून बाहेर पडल्याचं परेश रावल यांनी सांगितलं.

सकाळी उठल्यानंतर दुपारपर्यंत न्यूज पेपर वाचू नकोस

‘मानसिक आणि शारिरीक स्वास्थावर परिणाम होत असल्याने मी टि्वटरपासून लांब असतो’ असं परेश रावल यांनी सांगितलं. “मी टि्वटर वापरणं थांबवलय कारण त्याचा माझ्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतोय. त्यामुळे माझं ब्लड प्रेशर वाढतं. माझ्या डॉक्टरांनी मला स्पष्टपणे सांगितलय की बिछान्यावर झोपायला जाण्याआधी न्यूज चॅनल बघू नकोस आणि सकाळी उठल्यानंतर दुपारपर्यंत न्यूज पेपर वाचू नकोस. जर, तुला एखादी महत्वाची बातमी हवी असेल, तरी ती स्वत:च तुझ्यापर्यंत येईल. तुला तिथे बसून स्वत:ला हायपर करण्याची आवश्यकता नाही” असं परेश रावल म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *