Last Updated:
बाहेरून आलिशान स्पा सेंटर दिसायचं, मात्र आत सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
पुणे: पुण्यातील उच्चभ्रू आणि आयटी परिसराच्या जवळ असलेल्या बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावरून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका नामांकित इमारतीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली भलतंच कांड सुरू होतं. बाहेरून आलिशान स्पा सेंटर दिसायचं, मात्र आत सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जागामालकासह स्पाच्या मालकावर आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाषाण परिसरातील ‘द कॅपिटल’ या प्रसिद्ध इमारतीमध्ये ‘ग्रीनलिफ स्पा’ चालवले जात होते. मात्र, या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली पैशांचे आमिष दाखवून तीन महिलांकडून बेकायदेशीरपणे वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच बाणेर पोलिसांनी या स्पा सेंटरवर सापळा रचून छापा टाकला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून तीन पीडित महिलांची सुटका केली आहे. तसेच या काळ्या धंद्यामागे असलेल्या तीन मुख्य व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
स्पा सेंटरचा मालक, स्पा सेंटरचा व्यवस्थापक (मॅनेजर) आणि ती जागा भाड्याने देणारा जागामालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या बाणेर-पाषाण लिंक रोडवरील एका इमारतीत हा सर्व धक्कादायक प्रकार सुरू असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर स्पा सेंटर चालवणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Satara,Maharashtra
पुणे : बाहेरून दिसायची आलिशान इमारत; आत सुरू होतं भलतंच कांड, पोलिसांचा अचानाक छापा, 3 महिला अन्…
