EPFO Alert Profile Photo: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सदस्यांसाठी प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल केला आहे. e-नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि ऑनलाईन क्लेम सेटलमेंट सुटसुटीत करण्यासाठी युनिफाईड मेंबर पोर्टलवर(UAN) सदस्यांना प्रोफाईल फोटो अपलोड करावा लागणार आहे. प्रोफाईल फोटो हा सदस्याचा डिजिटल रेकॉर्डचा भाग आहे. ऑनलाईन व्हेरिफिकेशन प्रक्रियेदरम्यान त्याचा वापर करण्यात येणार आहे.
काय आहे अपडेट?
सध्या सर्व EPFO व्यवहारांसाठी प्रोफाईल फोटो अपलोड करण्याची गरज नाही. पण ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा फोटो अपलोड केलेला नाही. त्यांना e-नॉमिनेशन पूर्ण करण्यापासून ते ईपीएफओच्या इतर सेवांचा फायदा घेण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यासाठी ईपीएफओने एक अलर्ट दिला आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर पीएफ काढताना अडचण येणार नसल्याचे समोर आले आहे.
प्रोफाईल फोटो अपलोड का करावा?
मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, EPFO ने कर्मचाऱ्यांना याविषयीची सल्ला दिला आहे. ई-नॉमिनेशनसह इतर प्रक्रियेसाठी सदस्याचा फोटो एक डिजिटल पुरावा ग्राह्य मानला जाणार आहे. त्याआधारे पीएफ खात्यातील शिल्लक, एम्प्लॉईज पेन्शन स्कीम, एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स(EDLI) चे फायदे मिळतील. लाभार्थ्यांना रक्कम सहज हस्तांतरण करता येईल.
जर कर्मचाऱ्याने ईपीएफओ खात्यात त्याचा वारस नेमला नसेल आणि प्रोफाईल फोटोही नसेल तर कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदारांना दाव्याची रक्कम मिळण्यास उशीर होऊ शकतो. त्यासाठी त्यांना पुरावे आणि इतर कागदपत्रे सादर करावी लागतात. ही प्रक्रिया वेळ खाऊ असल्याने दाव्याची रक्कम मिळण्यास उशीर होऊ शकतो. पण प्रोफाईल अपडेट असेल तर कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना विम्याचा लाभ आणि पीएफ रक्कम काढून घेण्यासाठी कोणताही अडचण येणार नाही.
प्रोफाईलचा फोटो कसा अपडेट करणार?
ईपीएफओच्या युनिफाईड मेंबर पोर्टला भेट द्या. तिथे तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा अपलोड करा.
डॅशबोर्डवर गेल्यावर प्रोफाईल अथवा व्ह्यू हा पर्याय निवडा
आता प्रोफाईल फोटो अपलोड वा अपडेट करण्याचा पर्याय दिसेल. तो निवडा.
या ठिकाणी तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा. त्यानंतर सेव्ह बटण दाबा