Adinath – Urmila Divorce : जोडीदार म्हणून आमचा प्रवास..! आदिनाथ -उर्मिलाचा यांचा घटस्फोट, अखेर त्या चर्चांना पूर्णविराम | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर कोठारे यांचा घटस्फोट. सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती. मुलीसाठी एकत्र राहून करणार संगोपन.

News18
News18

मराठी मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ काठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे यांच्या नात्याच्या अनेक चर्चा सुरू होत्या. दोघांनी डिवोर्स घेतल्याच्या चर्चा होत्या. अखेर उर्मिला आणि आदिनाथ यांनी या चर्चांवर शिक्कामोर्तब केला आहे. दोघांनी परस्पर समंतीनं घटस्फोट घेतला आहे. सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट शेअर करत अधिकृतपणे ही माहिती शेअर केली आहे.

आदिनाथ आणि उर्मिला यांनी लिहिलंय, “आमचे मित्र, मीडिया आणि हितचिंतकांनो, खूप विचार केल्यानंतर, आम्ही, आदिनाथ महेश कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिज़ा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन (Co-parenting) करत आहोत. आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील.”

“गेल्या काही वर्षांत मीडिया आणि तुम्हा सगळ्यांनी आम्हाला जे भरभरून प्रेम आणि साथ दिली आहे, त्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आयुष्याच्या या नव्या टप्प्यावरही तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहतील, अशी आम्हाला आशा आहे. म्हणूनच, आमच्या या खाजगी प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा (Privacy) आदर करावा, अशी आमची नम्र विनंती आहे. या विषयावर आमचे हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार

नाही. तुमचं प्रेम आणि समजूतदारपणाबद्दल मनापासून धन्यवाद.” आदिनाथ आणि ऊर्मिला”

मराठी बातम्या/मनोरंजन/

Adinath – Urmila Divorce : जोडीदार म्हणून आमचा प्रवास..! आदिनाथ -उर्मिलाचा यांचा घटस्फोट, अखेर त्या चर्चांना पूर्णविराम



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *