Amitabh Bachchan Ranbir Kapoor Invested In Ayodhya: राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता


Amitabh Bachchan Ranbir Kapoor Invested In Ayodhya: अभिनेते अमिताभ बच्चन (Actor Amitabh Bachchan) यांनी अयोध्येत जमिनीचे अनेक भूखंड खरेदी (Plot Purchase) करण्यासाठी सुमारे 90 कोटी रुपयांची गुंतवणूक केलीय. तसेच, रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यानं राम मंदिर (Ram Mandir) परिसराजवळील एका आलिशान भूखंडासाठी 3.31 कोटी रुपयांची गुंतवणूक केलीय. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर, अयोध्येचा (Ayodhya) कायापालट होत असून हे शहर आलिशान रिअल इस्टेट (Real Estate), पायाभूत सुविधा आणि आध्यात्मिक पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनतंय. इथे नव्या हॉटेल्सपासून ते कनेक्टिविटी अनेक विकासकामं होत आहेत.

अमिताभ बच्चन यांची अयोध्येत 90 कोटींची मालमत्ता (Amitabh Bachchan Property Worth 90 Crore In Ayodhya)

बॉलिवूडमधील (Bollywood News) दिग्गज कलाकारांपासून ते बड्या उद्योजकांपर्यंत अनेकांनी अयोध्येत मोठी गुंतवणूक केलीय. राम मंदिराच्या उभारणीपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी (Bollywood Celebrity) रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी अयोध्येला (Ayodhya News) आपली पसंती दिल्याचं आपल्या कानावर आलं असेलच. यात सर्वात मोठं नाव होतं, बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं. 

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत मालमत्तेचा एक मोठा पोर्टफोलिओ उभा केला आहे. NBT नं दिलेल्या वृत्तानुसार, त्यांची एकूण गुंतवणूक 90 ते 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे. ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ (HoABL) या डेव्हलपरच्या माध्यमातून शहरातील आलिशान रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करणारे ते पहिलेच बडे सेलिब्रिटी ठरले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी रातोंरात केलेली गुंतवणूक (Amitabh Bachchan Invested In Ayodhya)

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना अभिनंदन लोढा यांनी 2023 मधील एका घटनेचा किस्सा सांगितलेला, जेव्हा ते ऑस्ट्रेलियात होते. एक दिवस पहाटे 3 वाजता त्यांना एक फोन आला. त्या फोनपूर्वी त्यांना काही ‘मिस्ड कॉल्स’ आणि मेसेज आले होते, ज्यात म्हटलेलं, “मी अमिताभ बच्चन बोलतोय, कृपया तुमच्या सोयीनुसार मला परत फोन करा…” जेव्हा अभिनंदन यांनी ‘बिग बीं’ना परत फोन केला, तेव्हा त्यांना अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, “अभिनंदन-जी, मी उत्तर प्रदेशचा आहे आणि मला अयोध्येत जमीन खरेदी करायचीय…” अभिनेत्यानं सुरुवातीला किंमतीबद्दल विचारणा केली आणि अभिनंदन यांनी त्यांना सांगितलं की, 15,000 चौरस फुटांच्या भूखंडाची किंमत 15 कोटी रुपये आहे. अमिताभ बच्चन यांनी दुसऱ्याच दिवशी 15 कोटी रुपये ट्रान्सफर केले आणि हा व्यवहार पूर्ण झाला.

अमिताभ बच्चन यांनी कुठे आणि किती गुंतवणूक केलीय? (Amitabh Bachchan Investing 90 Crore In Ayodhya)

  • सरयू प्लॉट: राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी खरेदी केलेला सुमारे 10,000 चौरस फुटांचा भूखंड, ज्याचे मूल्य सुमारे 14.5 कोटी रुपये आहे.
  • हवेली अवध: 4.54 कोटी रुपये मूल्याचा 5,372 चौरस फुटांचा भूखंड.
  • जवळील आलिशान भूखंड: सरयू विकास प्रकल्पाजवळ खरेदी केलेला 25,000 चौरस फुटांचा मोठा भूखंड, ज्याची किंमत सुमारे 40 कोटी रुपये आहे.
  • 67 एकर जमिनीचा भूखंड: त्यांची कौटुंबिक कंपनी ‘एबी कॉर्प लिमिटेड’ (AB Corp Ltd) द्वारे 35 कोटी रुपयांना खरेदी केलेला एक विशाल भूखंड.
  • हरिवंश राय बच्चन मेमोरियल ट्रस्ट: वडिलांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्यासाठी नोंदणीकृत केलेला 54,454 चौरस फुटांचा भूखंड.

रणबीर कपूर यांची गुंतवणूक (Ranbir Kapoor Investment)

रणबीर कपूर : अभिनेता रणबीर कपूर यानं अयोध्येतील आलिशान रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. ‘रामायण’ सिनेमात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारण्यापूर्वी, त्यानं खालील मालमत्ता खरेदी करून आपल्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओचा विस्तार केलाय…

सरयू टाउनशिपमधील भूखंडाविषयी

सरयू टाउनशिपमधील भूखंड : 2,134 चौरस फूट आकाराचा आणि 3.31 कोटी रुपये मूल्य असलेला एक प्रीमियम भूखंड. रणबीर कपूर यांनी या गुंतवणुकीचं वर्णन ‘दैवी बोलावणे’ आणि ‘दीर्घकालीन कौटुंबिक वारसा’ असं केलं आहे.

अयोध्या येथील पायाभूत सुविधांचा विकास

जगभरातील भाविकांसाठी अयोध्या हे एक प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी 85,000 कोटी रुपये खर्चाचे पायाभूत सुविधांचे प्रचंड प्रमाणावरील परिवर्तन सध्या सुरू आहे. यामध्ये महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अद्ययावत करण्यात आलेले अयोध्या धाम रेल्वे स्थानक आणि 187 किलोमीटर लांबीच्या ‘नमो भारत कॉरिडॉर’ला मिळालेली मंजुरी यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे; हा कॉरिडॉर कानपूर आणि अयोध्या यांना अवघ्या 90 मिनिटांत जोडेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Amitabh Bachchan Purchase Land In Ayodhya Paid 15 Crore: “मी अमिताभ, मला अयोध्येत जमीन घ्यायचीय…”; पहाटे 3 वाजता ‘बिग बीं’नी फिरवला फोन, दुसऱ्या दिवशीच उरकून टाकला कोट्यवधींचा व्यवहार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *