Jagannath Yatra 2026: आजपासून जगन्नाथ पुरी यात्रा सुरू! भगवंत रथात बसून नेमके कुठे जातात? रथाची दोरी ओढण्याचं महत्त्व जाणून थक्क व्हाल..


Jagannath Puri Yatra 2026: भगवान जगन्नाथांचा भव्य उत्सव आज 16 जुलैपासून सुरू होत आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी ही यात्रा सुरू होते. हा दिवस ओडिशा आणि संपूर्ण देशासाठी खूप विशेष आहे, जगन्नाथ पुरी यात्रा (रथयात्रा) ही हिंदू धर्मातील सर्वात प्राचीन आणि भव्य धार्मिक यात्रांपैकी एक मानली जाते. ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथयात्रेला लाखो भाविक उपस्थित राहतात. कारण जगन्नाथ पुरी यात्रा केवळ धार्मिक उत्सव नसून, भक्ती, समर्पण, समानता, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा मानली जाते. या रथयात्रेचे महत्त्व, भगवंत 15 दिवस विश्रांती का घेतात? रथाची दोरी ओढण्यामागे नेमकी काय श्रद्धा आहे? जाणून घ्या…

भगवंत आपल्या भावंडांसह रथात बसून कुठे जातात? जगन्नाथ पुरी रथयात्रेचे धार्मिक महत्त्व (Jagannath Puri Yatra 2026)

भगवान जगन्नाथ वर्षातून एकदा मंदिरातून बाहेर येऊन आपल्या भक्तांना दर्शन देतात. त्यामुळे ज्यांना मंदिरात प्रवेश करता येत नाही, त्यांनाही भगवानांचे दर्शन घेण्याची संधी मिळते. ही यात्रा भगवान श्रीकृष्णाच्या सर्वसमावेशक आणि सर्वधर्मसमभावाच्या संदेशाचे प्रतीक मानली जाते. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा हे तिघेही स्वतंत्र भव्य रथांमध्ये बसून गुंडिचा मंदिरात जातात. या प्रवासाला भगवान आपल्या मावशीच्या घरी जातात, अशी लोकमान्यता आहे. भगवान स्वतः भक्तांच्या भेटीस येतात, ही भावना या यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त करून देते. 

कधीपर्यंत असेल ही रथयात्रा?

ही रथयात्रा 24 जुलै रोजी बाहुडा यात्रेने समाप्त होईल. 27 जुलै रोजी होणाऱ्या नीलाद्री बीजे विधीने या उत्सवाची सांगता होईल. श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन (SJTA) यांनी ठरवलेल्या वेळापत्रकानुसार, रथ ओढण्याचा सोहळा आज दुपारी 4 वाजता होणार आहे. आज रवी योग देखील होत असून, त्यामुळे या रथयात्रेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. रथयात्रेदरम्यान, भगवान जगन्नाथ, त्यांचे थोरले बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा देवी यांच्यासह, रथातून त्यांच्या आत्याच्या घरी, म्हणजेच गुंडीचा देवी मंदिराकडे जातात

रथाची दोरी ओढण्याचं महत्त्व काय?

भगवंतांच्या रथाची दोरी ओढणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. श्रद्धेनुसार, यामुळे पापांचा क्षय होऊन मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो.
रथयात्रा भक्ती, समता आणि एकतेचे प्रतीक आहे. या दिवशी जात, पंथ किंवा सामाजिक स्तराचा कोणताही भेद मानला जात नाही.

भगवान जगन्नाथांचा रथ सर्वात शेवटी का ओढला जातो?

भक्तांची अशी श्रद्धा आहे की, रथयात्रेदरम्यान भगवान जगन्नाथांच्या रथात सहभागी होणे, त्यांचे दर्शन घेणे आणि दोर ओढल्याने प्रचंड पुण्य मिळते. जगन्नाथ रथयात्रा ही भगवंताप्रती भक्ती, अढळ श्रद्धा आणि समर्पणाचे प्रतीक मानली जाते. रथयात्रेसाठी कडुलिंबाच्या लाकडापासून तीन भव्य रथ बनवले जातात. बलरामांचा रथ, ‘तलाध्वज’ (लाल आणि हिरवा), सर्वात पुढे असतो, त्याच्यामागे सुभद्राचा रथ, ‘दर्पदलन’ किंवा ‘पद्मराथ’ (निळा आणि काळा), आणि जगन्नाथांचा रथ, ‘नंदी घोष’ किंवा ‘गरुडध्वज’ (लाल आणि पिवळा) असतो.

भगवंत 15 दिवस विश्रांती का घेतात?

  • रथयात्रेपूर्वी ‘स्नान पूर्णिमा’ दिवशी भगवानांना 108 कलशांनी अभिषेक केला जातो.
  • त्यानंतर भगवान 15 दिवस ‘अनवसर’ (विश्रांती) घेतात. या काळात भाविकांना दर्शन मिळत नाही.
  • रथयात्रेच्या दिवशी गजपती महाराज ‘छेरा पहरा’ विधी करतात. ते स्वतः सोन्याच्या झाडूने रथ स्वच्छ करतात,
  • ज्यातून सर्वजण भगवानांसमोर समान असल्याचा संदेश दिला जातो.
  • गुंडिचा मंदिरात काही दिवस मुक्काम केल्यानंतर भगवानांची ‘बहुदा यात्रा’ होऊन ते पुन्हा मुख्य मंदिरात परततात.

हेही वाचा :

संध्याकाळच्या वेळी घरातला केर का काढला जात नाही? रात्री केर काढावाच लागला तर काय करावं? गरुडपुराणातील ‘असे’ रहस्य, जे फार कमी लोकांना माहित…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *