Murlidhar Mohol Post On Pravin Tarde: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; म्हणाले ‘ बालपणापासून आजपर्यंत..’


Murlidhar Mohol Post On Pravin Tarde: मराठी मनोरंजन सृष्टीत सध्या ‘देऊळ बंद 2’ (Deool Band 2) या चित्रपटाच्या सक्सेसची एकच चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केलेले आहे या चित्रपटाने मराठी मनोरंजनसृष्टीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये नंबर 1 स्थान पटकावलं आहे. महाराष्ट्रभर चर्चा झालेल्या या चित्रपटाच्या यशानिमित्त मनोरंजन सृष्टीतील सर्व कलाकार,राजकीय नेते आणि चित्रपटाची टीम यांच्या उपस्थितीत एक धमाकेदार सक्सेस पार्टी झाली. या कार्यक्रमाचे सध्या एकच चर्चा आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यासाठी एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टची सध्या चर्चा आहे. 

खरंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची मैत्री कायम चर्चेत असते. लहानपणीचा जिवलग मित्र आज मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट लेखक दिग्दर्शक ठरलाय. असं म्हणत त्यांनी प्रवीण तरडे यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे.

काय म्हटलं मुरलीधर मोहोळ यांनी? 

दिग्दर्शक लेखक व भिनते प्रवीण तरडे यांच्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. ते म्हणाले ‘गोष्ट मोठी, १०० कोटी; अभिमान… मित्राच्या यशाचा ! बालपणापासूनचा माझा जिवलग मित्र, आणि आज मराठी चित्रपटसृष्टीतील सलग सहा सुपरहिट चित्रपट देणारा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे याच्या ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाने अवघ्या ५० दिवसांत १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. या दैदीप्यमान यशानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात सहभागी होतान मन अतिशय आनंदाने आणि अभिमानाने भरून आले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार जी यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

बालपणापासून आजपर्यंत आम्ही एकमेकांचा प्रवास जवळून पाहिला आहे. संघर्ष, कष्ट, स्वप्नं आणि त्यासाठी घेतलेली अथक मेहनत… या प्रत्येक टप्प्याचे आम्ही साक्षीदार आहोत. कोणतीही सिनेसृष्टीची पार्श्वभूमी नसताना, एका सामान्य शेतकरी कुटुंबातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रविणने आपल्या जिद्द, प्रतिभा आणि अविरत परिश्रमांच्या जोरावर मिळवलेले हे यश केवळ त्याचे वैयक्तिक यश नाही, तर असंख्य स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.एक मित्र म्हणून त्याच्या या यशाचा मनापासून अभिमान वाटतो. ‘देऊळ बंद २’च्या या ऐतिहासिक यशासाठी प्रविण आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! मराठी चित्रपटसृष्टीला अशीच नवनवी शिखरे गाठत राहण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते श्री. मोहनजी जोशी, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक श्री. राजेशजी पांडे, चित्रपटाचे निर्माते कैलाश वाणी, सिटी प्राइड थिएटर्सचे चाफळकर बंधू, श्री. अभिजित पानसे, श्री. मंगेश देसाई, स्नेहल प्रवीण तरडे, श्री. प्रसाद ओक, श्री. महेश लिमये, श्री. संजय जाधव, श्री. अवधूत गुप्ते, श्री. आदीनाथ कोठारे, श्री. कुशल बद्रिके, श्री. संतोष जुवेकर, श्री. सुबोध भावे, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, श्री. अभिजित खांडकेकर, श्री. विजू माने, डॉ. सलील कुलकर्णी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत, दिग्दर्शक उपस्थित होते.” अशी पोस्ट मंत्री मुरलीधर मोहळ यांनी केलीय.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *