भुलीच्या इंजेक्शनने स्वत:लाच संपवलं, प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्टने उचललं टोकाचं पाऊल; लातूर हादरलं | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

डॉ. मेहुल राठोड यांनी स्वतःलाच भूल देणारे इंजेक्शन टोचून घेऊन आपले आयुष्य संपवल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Latur News
Latur News

लातूर: लातूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शहरातील नामांकित ‘एम.जे. हॉस्पिटल’चे (M.J. Hospital) प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल ईश्वर राठोड (वय 44 ) यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे लातूरसह संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, डॉ. मेहुल राठोड यांनी स्वतःलाच भूल देणारे इंजेक्शन टोचून घेऊन आपले आयुष्य संपवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी या दृष्टीने तपास सुरू केला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके आणि अधिकृत कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू

डॉ. राठोड हे लातूरमधील अत्यंत प्रसिद्ध डॉक्टरांपैकी एक होते. अत्यंत कमी वयात त्यांनी हृदयरोगतज्ज्ञ म्हणून मोठी ख्याती मिळवली होती, अशा कर्तबगार डॉक्टराने अचानक इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे.

  सुसाईड नोटचा शोध सुरू

पोलिसांनी घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केले असून डॉ. राठोड यांनी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली आहे का, याचा तपास सुरू आहे. त्यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करून आत्महत्येमागील कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण समोर येणार

डॉ. मेहुल यांच्या पश्चात आई मीनाताई राठोड, पत्नी कॅन्सर सर्जन डॉ. प्रियंका राठोड आणि 6 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. रेणापूर मार्गावर खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोर एका हॉटेलसमोर त्यांची कार उभी आहे. घटनास्थळाचा पंचनामा सुरू असून तिथे काही इंजेक्शन सापडले आहेत. परंतु, ते त्यांनी घेतले की नाही, हे स्पष्ट नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागचे कारण स्पष्ट होईल. दरम्यान, आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू, याची अद्यापि नोंद झालेली नाही

रुग्ण आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का

डॉ. मेहुल राठोड हे अत्यंत मनमिळावू आणि संवेदनशील स्वभावाचे व्यक्ती म्हणून ओळखले जात. एम.जे. हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक रुग्णांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांचे कुटुंब, नातेवाईक, सहकारी डॉक्टर आणि त्यांच्या रुग्णांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाचा :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *