Surya Guru Yuti: 16 जुलै म्हणजे 3 राशींच्या भाग्योदयाची वेळ! सूर्य-गुरूची पॉवरफुल युती करणार मालामाल, पैसा चुंबकासारखा, नोकरीत प्रमोशनचे योग…


Surya Guru Yuti: ते म्हणतात ना, माणसाच्या आयुष्यात असा एक योग नक्कीच येतो, ज्यामुळे त्याचे आयुष्य संपूर्ण पालटते, ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची शुभ-अशुभ स्थिती ही माणसाच्या सुख-दु:खासाठी कारणीभूत ठरत असते, ज्योतिषींच्या मते, 16 जुलैचा दिवस अत्यंत खास आहे, कारण हा दिवस अनेक लोकांचे नशीब पालटू शकतो. या दिवशी सूर्य-गुरूची शक्तिशाली युती तयार होतेय. ज्याचा परिणाम 12 राशींच्या लोकांवर होताना दिसेल, मात्र 3 राशी अशा आहेत, ज्यांचे भाग्य फळफळू शकते. या लोकांचे करिअर आणि आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. जाणून घेऊया भाग्यशाली राशींबद्दल…

सूर्य-गुरूची पॉवरफुल युती करणार मालामाल…(Surya Guru Yuti)

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि गुरू हे मित्र ग्रह आहेत. 16 जुलै रोजी, सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल, जिथे गुरू आधीपासूनच आहे. सूर्य आणि गुरू यांच्यात ही युती होईल. ही युती विशेष मानली जाते कारण सूर्य आणि गुरू मित्र आहेत. काही राशींना या युतीमुळे फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया की या युतीमुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि गुरूची युती तुमच्या घरात आनंदाच्या वार्ता घेऊन येणार आहे, तुम्ही स्वतःचे घर किंवा जमीन खरेदी करू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाबद्दल प्रशंसा मिळू शकते. काही जण नवीन वाहन देखील खरेदी करू शकतील. सूर्य आणि गुरूची युती तुमच्या कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल घडवून आणू शकते.

कर्क (Cancer)

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि गुरूच्या युतीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांची स्वप्ने साकार होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या पालकांकडून पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या कामाच्या योजना पूर्ण होऊ शकतात. पहिल्या घरातील गुरूची स्थिती तुमच्यासाठी भाग्य आणि आर्थिक समृद्धी देखील आणते. आरोग्यात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकाल.

मीन (Pisces)

ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीसाठी ही युती शैक्षणिक यशाकडे नेऊ शकते. काही जण उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकतात. ज्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतला आहे, त्यांनाही अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत होऊ शकता आणि पैसे गुंतवू शकाल. या राशीच्या काही लोकांना सरकारी क्षेत्रातून लाभ मिळण्याचीही शक्यता आहे.

हेही वाचा :

कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाईल? कलियुगाचा अंत व्हायला किती वेळ शिल्लक? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *