अल्लाहसमोर हे हराम, मुस्लीम पुरुष..; आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाविरोधात फतवा – Marathi News | Fatwa issued regarding aamir khan third marriage with gauri spratt chief mufti video


आमिर खान-गौरी स्प्रॅट, मुफ्तीImage Credit source: Instagram

सध्या सर्वत्र अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाचीच चर्चा आहे. आमिरने 61 व्या वर्षी गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न करून आयुष्याची नवी सुरूवात केली आहे. मात्र आता या लग्नावरून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. आमिरने याआधी रीना दत्ताशी पहिलं आणि किरण रावशी दुसरं लग्न केलं होतं. रीना आणि किरणनंतर आता गौरीसुद्धा हिंदू असल्याने त्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. करण सेनापासून अनेक धर्मगुरू आणि राजकारणी आमिरच्या या तिसऱ्या लग्नाला विरोध करत आहेत. अशातच आता मुफ्ती प्रमुख मुफ्ती यांनी आमिरच्या लग्नावरून फतवा जारी केला आहे. मुफ्ती यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये चीफ मुफ्ती म्हणाले, “आमिर खानने तिसऱ्यांदा एका गैर मुस्लीम महिलेशी लग्न केलं आहे. त्याचा समाजात विरोध होत आहे. अशा परिस्थितीत समाजापर्यंत अल्लाहचा संदेश पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. अल्लाहने कुराणमध्ये आज्ञा दिली आहे की मुस्लीम पुरुषांना प्रामाणिक मुस्लीम महिलांशी विवाह करण्याची परवानगी आहे. अल्लाहने म्हटलंय की, जर कोणी विवाह करूनही आपली प्रतिज्ञा पूर्ण करत नसेल तर तो दोषी आहे. लग्न केल्यानंतर जर एखादी मुस्लीम व्यक्ती त्याची अवहेलना करत असेल, आपल्या जबाबदार पार पडत नसेल तर तो गुन्हेगार आहे. जर तुम्ही एका लग्नाला न्याय देऊ शकत नसाल, तर पुन्हा लग्न करू नये.”

पहा व्हिडीओ

मुंबईतील वांद्रे (पाली हिल) इथल्या राहत्या घरातच आमिर खानने गौरीशी तिसरं लग्न केलं. या लग्नाला फक्त दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि काही अत्यंत जवळचे मित्र उपस्थित होते. मूळची बंगळुरूची असलेली गौरी स्प्रॅट सौंदर्य आणि वेलनेस उद्योगात कार्यरत आहे. ती ‘बी ब्लंट’ या सलून चेनची भागीदार आणि संचालकही होती. सध्या गौरी आमिर खान प्रॉडक्शन्समध्ये साहाय्य करते. गौरीचंही हे दुसरं लग्न असून तिच्या पूर्व पतीविषयी कोणतीही माहिती समाजमाध्यमांवर उपलब्ध नाही. पहिल्या पतीपासून तिला सहा वर्षांचा एक मुलगा आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *