Crime news Samruddhi Mahamarg: बापाने आईला संपवलं, तीन निरागस चिमुरड्यांना काहीच समजलं नाही, पोलीस स्टेशनमध्ये येताच ब्लँकेटवर अंग टाकून झोपी गेले


Washim Murder news: वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर एकाचवेळी संतापजनक आणि काळजाला चटका लावणारी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या नोएडा येथे राहणाऱ्या  सलमान खान नेक खान या व्यक्तीने त्याची पत्नी हसीना बांनो हिचा समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg)  प्रवासादरम्यान डोक्यात वार करत आणि गळा दाबून तिची हत्या (Murder news) केली. यानंतर सलमान याने वाशिम येथील कारंजा पोलीस ठाणे गाठले आणि तो पोलिसांना (Washim Police) शरण गेला. हा सगळा प्रकार घडला तेव्हा सलमान आणि हसीन यांच्यासोबत त्यांची तीन लहान मुलंही होती. या सगळ्यांना घेऊन सलमान पोलीस ठाण्यात हजर झाला. (Crime news in Marathi)

सलमान खान हा उत्तर प्रदेशमधून  त्याच्या कारने महाराष्ट्रात आला होता. या निर्दयी पतीने पत्नीसह तीन चिमुकल्या मुलांसह प्रवास सुरु केला.  मात्र, प्रवासात पती-पत्नीमध्ये चारित्र्यावर संशय घेण्यावरुन वाद झाला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी सलमान याने टोकाचा निर्णय घेत आपल्या पत्नीची हत्या केली. यानंतर सलमान याने काही किलोमीटरचा प्रवास करत  कारंजा पोलीस ठाणे गाठले आणि  गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेनंतर  कारंजा पोलिसांनी सलमानला ताब्यात घेत  हत्या कुठे का आणि कशी केली याबाबत तपास सुरु केल्याची माहिती, वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी दिली.

दरम्यान, सलमान याने गाडीत आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली तेव्हा या दोघांची तीन लहान मुलंही गाडीतच होती. हा सगळा प्रकार त्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितला. हसीना बांनो हिला ठार मारल्यानंतर सलमान तिन्ही लहान मुलांना सोबत घेऊनच पोलीस ठाणे गाठले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर या लहान मुलांचे काय करायचे, हा प्रश्न पोलिसांना पडला. आईची हत्या झाल्याने आणि वडील आता तुरुंगात जाणार असल्याने ही तिन्ही लहान मुलं पोरकी झाली आहेत. सलमान आपल्यासोबतच या तीन चिमुरड्यांना पोलीस ठाण्यात घेऊन आला आणि त्यांना तिथेच अंथरलेल्या एका ब्लँकेटवर झोपले. या तिन्ही निरागस आणि निष्पाप मुलांना त्यांच्या आईसोबत नेमकं काय झालं आहे आणि आता आपल्यावरील पालकांचे छत्र हरपले आहे, याची थोडीशी कल्पना नव्हती. ही तिन्ही चिमुकली मुलं आपल्या वडिलांसोबत अगदी निरागसपणे चालत पोलीस स्टेशनमध्ये शिरली आणि तिथे अंथरलेल्या एका ब्लँकेटवर अंग टाकून झोपी गेली. हा प्रसंग पोलीस स्टेशनमधील उपस्थितांचे काळीज हेलावून टाकणारा होता. 

आणखी वाचा

Jalgaon Crime News: सोनोग्राफी रिपोर्टवरून वाद, सासू अन् पतीने अंध माय-लेकाला विहिरीत ढकललं; साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत; जळगाव हादरलं!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *