Maharashtra News LIVE: मोशी दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल – Marathi News | Maharashtra News Live Updates in Marathi 14 July 2026 Uddhav Thackeray Andolan Politics eknath Shinde Mumbai Pune Rain Alert


  • 14 Jul 2026 09:40 AM (IST)

    बैलगाडा शर्यतीतील वादाचे पडसाद आता थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत

    सणसवाडी येथील डोंगरवस्ती चौकात महिंद्रा थारने ॲक्टिव्हा दुचाकीला धडक दिल्याने चेतन हरगुडे आणि अथर्व हरगुडे हे दोघे गंभीर जखमी झाले. बैलगाडा शर्यतीतील जुन्या वादातून ही घटना घडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी संतोष मोडक आणि प्रज्वल मोडक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हा जीवघेणा हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे..

  • 14 Jul 2026 09:30 AM (IST)

    सोलापुरात तरुणांकडून वडाची झाडे दोऱ्याच्या विळख्यातून मुक्त करण्याचा उपक्रम

    ऑपरेशन मोकळा श्वास अभियान राबवत शहरातील विविध वडाच्या झाडांचे दोरे काढून टाकण्यात आले. वडाच्या झाडाला दोरे असल्याने वटवाघुळ तसेच इतर पक्षांच्या अधिवासाला धोका असल्याची बाब समोर आली. त्यानंतर सोलापुरातील एकत्व फाउंडेशन या तरुणांच्या सामाजिक संघटनेने हा उपक्रम राबवला आहे. यावेळी झाडांभोवती साचलेले निर्माल्यही गोळा करून त्याची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

  • 14 Jul 2026 09:20 AM (IST)

    नालासोपा-यात एका तळीरामाचा भर रस्त्यात धिंगाणा

    धिंगाणा घालणाऱ्या दारुड्याला पकडून रिक्षात बसवीत असताना पोलिसांना ही धक्काबुकी आणि अश्लील शिवीगाळ
    तळीरामच्या भर रस्त्यातील धिंगाणा घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नालासोपारा पश्चिम शनी मंदिर परिसरात सायंकाळ च्या सुमारास घडली घटना. दारूड्याला पकडून नालासोपारा पोलिसांनी घेतले ताब्यात

  • 14 Jul 2026 09:05 AM (IST)

    रेन वॉटर हार्वेस्टिंग नसलेल्या मोठ्या गृहप्रकल्पांवर कारवाईचे आदेश

    गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आक्रमक. रेन वॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी न करणाऱ्या प्रकल्पांवर दंडात्मक कारवाई होणार. गोदापात्रातील अतिक्रमण आणि सांडपाणी रोखण्यासाठी सर्व यंत्रणांना युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना. गोदावरी प्रदूषित करणाऱ्यांवर पोलिस आणि मनपाची संयुक्त कारवाई होणार. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाचा अॅक्शन प्लॅन

  • 14 Jul 2026 09:00 AM (IST)

    एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या घेणार भेटी

    एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर असून भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याची माहिती आहे. ऑपरेशन टायगरनंतर शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

  • 14 Jul 2026 08:50 AM (IST)

    उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील 15 नगरसेवकांना ‘मातोश्री’वर बैठकीसाठी बोलावलं

    उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील 15 नगरसेवकांना ‘मातोश्री’वर बैठकीसाठी बोलावलं आहे. बुधवारी मुंबईत ही महत्त्वाची बैठक होणार आहे. नाशिकमध्येही ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची चर्चा असल्याने याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नगरसेवकांची बैठक घेणार आहेत. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचे दहा ते बारा नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ही फक्त चर्चा आहे असं म्हणत, उद्धव ठाकरेंच्या स्थानिक नेत्यांनी यापूर्वीच हा दावा फेटाळून लावला आहे.

  • 14 Jul 2026 08:40 AM (IST)

    रायगड पालकमंत्री पदाबाबत आज महत्त्वाची बैठक

    रायगड पालकमंत्री पदाबाबत आज महत्त्वाची बैठक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले यांच्यात ही बैठक पार पडणार आहे. रखडलेल्या पालकमंत्री पदाबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सरकार स्थापन झाल्यापासून रायगड पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. रायगडमधील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला सोडल्यानंतर रायगड पालकमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला होता.

  • 14 Jul 2026 08:30 AM (IST)

    सोमवारी रात्री पार पडली भाजपच्या कोअर कमिटीची बैठक

    सोमवारी रात्री भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, ॲड. आशिष शेलार, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश तसेच आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदावर सलग 2 हजार 431 दिवस पूर्ण करत राज्याच्या राजकीय इतिहासात नवा टप्पा गाठला आहे. यासह त्यांनी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचा 2 हजार 412 दिवसांचा विक्रम मागे टाकत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत तिसरं स्थान मिळवल्यानं सर्व नेत्यांकडून त्यांचं कौतुक करण्यात आलं.

  • 14 Jul 2026 08:25 AM (IST)

    नाशिक – पावसाने बदलला त्र्यंबकेश्वर येथील साधू ग्रामचा आराखडा

    साधुग्रामासाठी निश्चित करण्यात आलेली जागा पाण्याखाली गेल्याने आणि संपूर्ण परिसर चिखलमय झाल्याने प्रशासनाने साधुग्रामाचं नियोजन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. भाविक आणि साधू-महंतांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत उंच आणि पूरमुक्त पर्यायी जागेचा शोध पूर्ण झाला आहे. त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थान परिसरात सुमारे २५० एकर जागा साधुग्रामासाठी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नाशिक त्रंबकेश्वर येथे 2027 मध्ये भरणारा कुंभमेळा पावसाळ्यात असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

  • 14 Jul 2026 08:20 AM (IST)

    नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील तीन संशयीतांना शहरात प्रवेश बंदी

    नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील तीन संशयीतांना शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तिन्ही संशयितांना न्यायालयाने जामीन देताना कठोर अटी घालत नाशिक शहरात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. बहुराष्ट्रीय कंपनीतील सहकाऱ्याच्या धार्मिक भावना दुखावून त्याचा छळ केल्याप्रकरणी अटक केली होती. प्रकरणातील संशयित रझा मेमन, तौसिफ अत्तार आणि शाहरुख कुरेशी यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित खारकर यांनी आदेश दिला आहे.

  • 14 Jul 2026 08:15 AM (IST)

    मीरा भाईंदरमध्ये फुटपाथच्या गटारावर झाकण नसल्याने म्हैस गटारात कोसळली

    मीरा-भाईंदर इंद्रलोक फेस 4 मध्ये फुटपाथच्या गटारावर झाकण नसल्याने एक म्हैस गटारात कोसळल्याची धक्कादायक घटना रात्री बाराच्या सुमारास घडली असून, पालिकेचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. गटारावरील झाडांचा पाला खाण्यासाठी गेलेली म्हैस आत पडल्याने तिच्या शिंगाला गंभीर दुखापत झाली. अग्निशमन दल आणि नवघर पोलिसांनी तब्बल ४ तास शर्थीचे प्रयत्न करत, जेसीपी आणि क्रेनच्या साहाय्याने म्हशीला सुरक्षित बाहेर काढलं. मुंबईतील मॅनहोल दुर्घटना ताज्या असतानाही मीरा भाईंदर महानगर पालिकेला जाग आली नसल्याने, आता आयुक्त संबंधित निष्काळजी अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

  • 14 Jul 2026 08:12 AM (IST)

    मोशी दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

    पिंपरी चिंचवड परिसरातील मोशी येथील महापालिकेच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात घडलेली भीषण दुर्घटनेप्रकरणी अखेर कारवाईला वेग आला आहे. या दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकल्प प्रमुख अशोककुमार गुप्ता आणि सेफ्टी अधिकारी विजय सपकाळ यांच्याविरोधात पालिकेनं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे.



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *