शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत मोठ्या अडचणीत सापडले. त्यांची सून गिरीजा राऊत हिने गंभीर आरोप केले. पती आणि मुंबई महापालिकेचा नगरसेवक गितेश राऊत यांच्यावरच नाही तर संपूर्ण राऊत कुटुंबावर तिने आरोप केले. या प्रकरणात विनायक राऊत, गितेश राऊत याच्यासह तब्बल 7 जणांवर गुन्हे दाखल झाली. या प्रकरणातील दोन भोंदुबाबांना पोलिसांकडून अटकही करण्यात आली. या बाबांना आज पुन्हा कोर्टात हजर केले जाईल. सूनबाईच्या आरोपांवर थेट विनायक राऊत यांनी भाष्य केले. काल त्यांनी पत्रकार परिषद घेत गिरीजा राऊत हिच्यावर गंभीर आरोप केले. हेच नाही तर घर सोडताना गिरीजा राऊत नक्की काय काय घेऊन गेली याचा पाडाचा राऊतांनी वाचला. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
काैटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच हादरवणारे आरोपही तक्रारीत करण्यात आलीत. जादूटोणा करत असल्याचेही तिने तक्रारत म्हटले. तिचे केस कापले, गोमूत्र पाजले असेही काही आरोपी गिरीजा राऊत हिने केले. गिरीजा राऊत तेवढ्यावरच थांबली नाही तर तिने पती गितेश याने लग्न झाल्यानंतर आपल्यासोबत शारीरिक संबंधच ठेवले नसल्याचे म्हटले.
तिने विदेशात गेल्यावर त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता गितेश याने तिला मारहाण केली. हेच नाही तर मुंबईत असताना तो म्हणायचा की, आईला आवाज जाईल, गावी गेल्यावरही तो वेगळी कारण सांगत. मी नाजूक मुलगा आहे, असेही त्याने अनेकदा म्हटले. माझ्या पालकांनी हा सर्व प्रकार सासरे (विनायक राऊत) यांच्या कानावर घातला होता, असेही गिरीजा राऊतने म्हटले.
या प्रकरणानंतर राजकारणात मोठा भूकंप आल्यानंतर आता गिरीजा राऊत हिने मोठा निर्णय घेतला. गिरीजा राऊत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचणार आहे. फडणवीस यांना भेटून आपल्यासोबत काय घडले हे गिरीजा राऊत सांगणार आहे. यामुळे विनायक राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय.