Last Updated:
इंधनाचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने इथेनॉल हा पर्याय समोर आणला. आता पेट्रोल नंतर डिझेलमध्येही हा प्रयोग केला जाणार आहे.
भारतात सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केलं जात आहे. आधी E20 इंधन आणण्यात आलं. आता E85 हे इंधन सुद्धा आणलं आहे. पण, E20 इंधनामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या इंजिनमध्ये बिघाड होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सोशल मीडियावर सरकारच्या निर्णयाविरोधात रोष व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे आता सरकारकडून डिझेलमध्ये आता आयसोब्युटेनॉल आणण्याच्या तयारीमध्ये आहे. डिझेलमध्ये पेट्रोल प्रमाणाचे १५ टक्के आयसोब्युटेनॉल मिक्स करण्यासाठी सरकारकडून चाचण्या सुरू आहे.
इंधनाचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने इथेनॉल हा पर्याय समोर आणला. आता पेट्रोल नंतर डिझेलमध्येही हा प्रयोग केला जाणार आहे. इथेनॉलपासून आयसोब्युटेनॉल तयार केलं जात आहे. आयसोब्युटेनॉल एक चांगलं बायोफ्यूएल आहे, जे डिझेलसोबत चांगल्या प्रकारे मिसळू शकतं. पायलट प्रोजेक्ट्समध्ये चांगले रिझल्टही मिळाले आहे. अनेक कंपन्या 2 टक्के मिश्रणाचं ट्रायल्स सुरू करणार आहेत. ही योजना डिझेलच्या वापरामुळे E20 पेक्षाही मोठा प्रभाव टाकू शकते, कारण भारतात पेट्रोलच्या तुलनेत डिझेलचा वापर जवळपास दुप्पट आहे. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न, कमी आयात बिल आणि प्रदूषण कमी होण्याची अपेक्षा आहे.
आतापर्यंत इथेनॉल-डिझेल मिश्रणाचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता, कारण इथेनॉल डिझेलमध्ये चांगले मिसळत नाही आणि इंजिनसाठी समस्या निर्माण करतं. यानंतर सरकारने आयसोब्युटेनॉलवर लक्ष केंद्रित केलं. 2025 मध्ये ARAI (Automotive Research Association of India) ने 10 टक्के मिश्रणाचा अभ्यास सुरू केला. 2026 मध्ये HPCL, BPCL, Praj Industries आणि टाटा मोटर्स सारख्या संस्थांसोबत 2 टक्के आयसोब्युटेनॉल-डिझेल मिश्रणाचे पायलट ट्रायल्स Q2 FY2027 पासून सुरू होणार आहेत. अनेक जनरेटर सेट्स 100 टक्के इथेनॉल आणि आयसोब्युटेनॉलवर यशस्वीरित्या चालवले गेले आहेत. हे भारताला डिझेल बायोफ्यूएल प्रोग्राममध्ये पहिलं मोठं पाऊल पडलं.
“इथेनॉल थेट डिझेलमध्ये मिसळता येत नाही, त्यामुळे आम्ही इथेनॉलपासून आयसोब्युटेनॉल तयार करत आहोत. आयसोब्युटेनॉल डिझेलचा पर्याय बनू शकते. आम्ही 15 टक्के आयसोब्युटेनॉल मिश्रणाकडे वाटचाल करत आहोत. पायलट डेमोन्स्ट्रेशनच्या चांगल्या निकाल आला आहे. इंजिन या इंधनांवर चालू शकतात. हे पाऊल ऊर्जा आत्मनिर्भरता, आयात कमी करणे आणि स्वच्छ वाहतुकीसाठी महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली.
सरकार सुरुवातीला 2 टक्के मिश्रणाचं ट्रायल्स करेल, जे नंतर 15 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर 2027 पासून सुरूवात होऊ शकते. Praj Industries सारख्या कंपन्या उत्पादन क्षमता वाढवत आहेत.
जास्त ऊर्जा मिळेल इथेनॉलपेक्षा चांगला पर्य़ाय आहे. मायलेजवरही कमी परिणाम होईल. इंजिन, पाइपलाइन आणि स्टोरेजसाठी सुरक्षित असेल. विशेष म्हणजे, पर्यावरणपूरक असून कमी उत्सर्जन, स्वच्छ इंधन मिळेल. पण याचे काही तोटेही आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काही वाहनांचे थोडे मायलेज कमी होऊ शकते. उत्पादन वाढवण्यासाठी आणि पायाभूत सुविधांमध्ये खूप पैसा लागेल.
Mumbai,Maharashtra
Jul 13, 2026 11:39 PM IST
E20 च्या यशानंतर आता डिझेलची बारी, 15 टक्के मिक्स आयसोब्युटेनॉल येणार! सरकारचा मोठा प्लॅन
