या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी

OTT Upcoming this Week:OTT प्रेक्षकांसाठी हा आठवडा मनोरंजनाची पर्वणी घेऊन आला आहे. 13 ते 17 जुलैदरम्यान क्राइम थ्रिलर, अ‍ॅक्शन-कॉमेडी, रोमँटिक ड्रामा, ट्रू-क्राइम डॉक्युमेंट्री आणि कोरियन फँटसी अशा विविध धाटणीच्या चित्रपट आणि वेबसीरिज वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. ‘रक्तांचल सीझन 3’पासून ते ‘मर्डर 101’ आणि ‘द ईस्ट पॅलेस’पर्यंत अनेक बहुप्रतिक्षित रिलीज या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे या आठवड्यात घरबसल्या काय पाहायचं, याची संपूर्ण यादी जाणून घ्या.

रक्तांचल सीझन 3

‘रक्तांचल सीझन 3’ 16 जुलै 2026 पासून Amazon MX Player वर स्ट्रीम होणार आहे. ऋतम श्रीवास्तव दिग्दर्शित ही क्राइम ड्रामा मालिका पूर्वांचलमधील माफिया नेटवर्कवर आधारित आहे. मागील दोन सीझनप्रमाणेच ही मालिका प्रेक्षकांना कोणतेही सबस्क्रिप्शन न घेता मोफत पाहता येणार आहे.

या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी

तिसरी बेगम

के. सी. बोकाडिया लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित ‘तिसरी बेगम’ हा चित्रपट 18 जुलै 2026 रोजी Waves या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपटही प्रेक्षकांना मोफत पाहता येईल.

या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी

सेकंड लव्ह

‘बाहुबली’ फेम अभिनेत्री रम्या कृष्णन होस्ट करत असलेला ‘सेकंड लव्ह’ हा तमिळ रिअॅलिटी डेटिंग शो 13 जुलैपासून JioHotstar वर स्ट्रीम होत आहे. 30 वर्षांच्या आसपास वय असलेल्या आणि यापूर्वी प्रेमभंगाचा अनुभव घेतलेल्या 12 सिंगल स्पर्धकांना या शोमध्ये सहभागी करण्यात आले आहे. जुन्या आठवणींमधून बाहेर पडून प्रेमाला पुन्हा एक संधी देण्याचा त्यांचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे.

या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी

राइड ऑर डाय

हॅना वॅडिंगहॅम आणि ऑक्टेव्हिया स्पेन्सर यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘राइड ऑर डाय’ ही अ‍ॅक्शन-कॉमेडी मालिका 15 जुलैपासून Prime Video वर पाहता येणार आहे. एका महिलेचा आंतरराष्ट्रीय सुपारी किलर असल्याचा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर दोन जिवलग मैत्रिणींचे आयुष्य कसे बदलते, याची कथा या मालिकेत आहे.

या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी

डिजायर

लुडविका पॅलेटा आणि जोसे मारिया याझपिक यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘डिजायर’ हा चित्रपट 17 जुलैपासून Netflix वर स्ट्रीम होणार आहे. एका स्विमिंग कोचच्या आगमनानंतर एका कुटुंबाच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या भावनिक आणि धोकादायक वळणाची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

द हॉक

विल फेरेल अभिनित ‘द हॉक’ ही कॉमेडी मालिका 16 जुलैपासून Netflix वर प्रदर्शित होणार आहे. लॉनी हॉकिन्स उर्फ ‘द हॉक’ या वयस्कर व्यावसायिक गोल्फपटूची ही कथा आहे. हरवलेलं यश पुन्हा मिळवण्याचा आणि गोल्फमधील ग्रँड स्लॅम पूर्ण करण्याचा त्याचा प्रयत्न या मालिकेत दाखवण्यात आला आहे.

वदरिंग हाइट्स

दिग्दर्शिका एमराल्ड फेनेल यांच्या ‘वदरिंग हाइट्स’ या रोमँटिक चित्रपटात मार्गोट रॉबी आणि जेकब एलॉर्डी मुख्य भूमिकेत आहेत. दोन व्यक्तींच्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट 13 जुलैपासून JioHotstar वर पाहता येत आहे.

या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी

मर्डर 101

‘मर्डर 101’ ही तीन भागांची ट्रू-क्राइम डॉक्युमेंट्री मालिका 13 जुलैपासून Prime Video वर स्ट्रीम होत आहे. अमेरिकेतील अनेक दशकांपूर्वीच्या ‘रेडहेड मर्डर्स’ प्रकरणावर आधारित या मालिकेत टेनेसीमधील एका हायस्कूलमधील समाजशास्त्राच्या वर्गातील विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक अ‍ॅलेक्स कॅम्पबेल हे अनेक वर्षे न सुटलेल्या हत्याकांडांचा तपास करताना दिसतात.

या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी

रेडी ऑर नॉट 2: हिअर आय कम

‘रेडी ऑर नॉट’ (2019) या चित्रपटाचा सिक्वेल असलेला ‘रेडी ऑर नॉट 2: हिअर आय कम’ हा कॉमेडी-हॉरर चित्रपट 16 जुलैपासून JioHotstar वर प्रदर्शित होणार आहे. समारा वीव्हिंग पुन्हा एकदा ग्रेस मॅककॉलेच्या भूमिकेत दिसणार असून, कॅथरीन न्यूटन, सारा मिशेल गेलर, शॉन हॅटोसी, डेव्हिड क्रोननबर्ग आणि इलायजा वूड यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

द ईस्ट पॅलेस

‘द ईस्ट पॅलेस’ ही कोरियन फँटसी-थ्रिलर मालिका 17 जुलैपासून Netflix वर प्रदर्शित होणार आहे. नाम जू-ह्युक, रो युन-सो आणि चो सेउंग-वू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत आत्म्यांच्या जगात फिरू शकणारा एक तरुण आणि मृत व्यक्तींचे आवाज ऐकू शकणारी एक महिला राजाच्या आदेशानुसार एकत्र येऊन अनेक गूढ रहस्यांचा उलगडा करताना दिसतात.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *