फिफा आता वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं गवत विकून पैसे कमवणार, एका तुकड्यासाठी इतके लाख – Marathi News | FIFA will now make money by selling grass from the World Cup final 2026 know price and all details


फिफा आता वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं गवत विकून पैसे कमवणार, एका तुकड्यासाठी इतके लाखImage Credit source: fifa world cup twitter

FIFA to sell pieces of World Cup final stadium pitch: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या विजेता कोण असेल? याची उत्सुकता ताणली गेली आहे. असं असताना फिफाच्या एका निर्णयाने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण फिफाने पैसे कमवण्यासाठी एक नवीन क्लृप्ति वापरण्याचा निर्णय घेतला आहे. 20 जुलैच्या मध्यरात्री न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियममध्ये अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात मैदानावरील गवत तुकड्यांमध्ये विकण्याचा निर्णय घेतला आहे. फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतील ऐतिहासिक ठेवा म्हणून मैदानातील हे गवत विकण्याचा निर्णय घेतला आहे. फुटबॉलप्रेमी या मैदानातील ऐतिहासिक ठेवा जपून ठेवण्यासाठी इच्छुक असतील यात काही शंका नाही. पण यासाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे. कसं काय ते समजून घेऊयात…

पीस ऑफ द पीच

फिफाने अधिकृत डिजिटल स्टोरच्या या पीस ऑफ द पिचची चार वेगवेगळ्या कॅटेगरीत विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही कॅटेगरी 2026 पेक्षा जास्त तुकडे विक्रीसाठी नसतील. वर्ल्डकप 2026 म्हणून त्यांनी विक्रीसाठी प्रत्येक कॅटेगरीत 2026 भागच ठेवले आहेत. या कॅटेगरीतील सर्वात कमी किंमत ही 450 डॉलर आहे. तर इतर कॅटगरीत 900 डॉलर, 1200 डॉलर आणि प्रिमियम वर्जसाठी 3000 डॉलर किंमत ठेवली गेली आहे. भारतीय रुपयाची तुलना केली तर सर्वात मैदानातील गवताचा तुकडा हा 43 हजार रुपयांचा आहे. तर महागडा तुकडा हा जवळपास 3 लाखांचा आहे.

अंतिम सामन्याच्या मैदानी गवताचे छोटे तुकडे हे प्रिमियम अॅक्रालिक फ्रेमध्ये सुरक्षित ठेवले जातील. इतकंच काय तर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला एक डिजिटल युएसबी किपसेक आणि एक प्रिमियम बॉक्स दिला जाईल. प्रिमियम एडिशन बॉक्सध्ये 3 बाय 3 चा गवताचा तुकडा असणार आहे. या सोबत सोन्याचं नक्षिकाम असलेलं एक रेप्लिका तिकीट, वर्ल्डकप फुटबॉलची एक छोटी रेप्लिका आणि एक क्रिस्टल कट वर्ल्डकप ट्रॉफी असेल.

कोणाला विकत घेता येईल?

अंतिम सामना अजून होणं बाकी आहे. हा सामना संपला की लगेचच मैदानातील गवत कापून प्रॉडक्शन तयार केलं जाईल. त्यामुळे खरेदीदारांना फायनल सामना संपल्यानंतर डिलिव्हरी दिली जाईल. पण सुरक्षेच्या कारणास्तव आणि लॉजिस्टिक्समुळे हे गवत फक्त अमेरिका आणि यूरोपच्या पत्त्यांवर डिलीव्हर केलं जाईल.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *