वहिनींचे सर्व लाड पुरवता, भाऊराया,आता तुम्हाला लाडक्या बहिणी ‘जड’ झाल्यात का?; 92 लाख महिला अपात्र ठरताच महिला नेत्याचा सरकारवर हल्ला – Marathi News | Ladki Bahin Yojana 92 Lakh Women Out, e KYC Sparks Controversy in Maharashtra opposition slams Govt


लाडकी बहीण योजनेवरू महिला नेत्याचा सरकारवर हल्ला

राज्यातील महायुती सरकारची बहुचर्चित, महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मोठा गाजावाज सुरू करत झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. पण जसजसा काळ पुढे गेला, तसतसे फसवणुकीचे अनेक प्रकार उघड झाले, त्यानंतर ईकेवायसी लागू करण्यात आली, पडताळणी सुरू झाली. आता याच लाडीक बहीण योजनेबद्दल मोठी अपड़ेट समोर आली आहे. या योजनेतून अनेक महिलांची नाव वगळण्यात आली आहेत मात्र आता थोड्याथोडक्याा  नव्हे तर तब्बल 92 लाख बहिणींचा हप्ता बंद होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पडताळणी आणि ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर लाभार्थी यादीतून तब्बल 92 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळण्यात आली आहेत.

यामुळे मोठी खळबळ माजली असून लाडक्या बहिणींसाठी हा मोठा धक्का आहे. मात्र याच मुद्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरलं असून अनेकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या, रोहिणी खडसे यांनी तर ट्विट करत सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच विजय वडेट्टीवार यांनीही सरकारला सुनावलं आहे.

रोहिणी खडसे यांचा हल्लाबोल

तुम्हाला लाडक्या बहिणी ‘जड’ झाल्यात का ? वहिनींचे सगळे हट्ट, सगळे लाड पुरवता, मग तुम्हाला लाडक्या बहिणीचं नको झाल्यात का ? असा डायकरेक्ट सवालच खडसे यांनी विचारला आहे. X वर एक मोठी पोस्ट रोहिणी खडसे यांनी केली आहे.

काय आहे रोहिणी खडसे यांची पोस्ट ?

काही महिन्यांपूर्वी ८० लाख पेक्षा अधिक महिला लाडकी बहिण योजनेतून बाद करण्यात आल्या होत्या. आता महिन्याभराने आणखी १२ लाख लाडक्या बहिणींना बाद करण्यात आले आहे. असं करून सरकारने तब्बल ९२ लाख महिलांना अपात्र केलं आहे.

सरकारमधील लोक सांगतात की लाडक्या बहिणींचा खर्च २६ हजार १९७.७८ कोटींवरून ३३ हजार ६९७ कोटींवर गेला आहे. लाडक्या बहिणींवर ७५०० कोटींचा खर्च वाढला आहे.

काय ओ भाऊ राया,
@CMOMaharashtra

@mieknathshinde
. आता तुम्हाला लाडक्या बहिणींचा खर्च दिसतोय ? आता तुम्हाला लाडक्या बहिणी ‘जड’ झाल्यात का ? वहिंनींचे सगळे हट्ट, सगळे लाड पुरवता, मग तुम्हाला लाडक्या बहिणीच नको झाल्यात का ?

लाडक्या बहिणींचा खंबीर ‘दादा’ आता नाही पण किमान सुनेत्रा वहिनी तुम्ही तरी लाडक्या बहिणींवर होणारा अन्याय मांडा !

असं रोहिणी खडसे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

तर दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर टीकेचा आसूड ओढला आहे. राजकीय हित साध्य झाले… आता लाडक्या बहिणींना विसरले! असं म्हणत वडेट्टीवार यांनीही X वर लाडकी बहीण संदर्भात ट्विट केलं आहे.

विजय वडेट्टीवार यांची पोस्ट काय ?

निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणी म्हणून ज्या महिलांना डोक्यावर घेतले, त्याच महिलांना सत्ता मिळताच योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. तब्बल ९२ लाख महिलांना योजनेतूनi वगळण्याचा निर्णय हा महिलांच्या विश्वासघाताचा आणि राजकीय स्वार्थाचा कळस आहे.

सत्ता मिळवण्यासाठी कोणतीही शहानिशा न करता सरसकट लाभ वाटण्यात आला, पण आता वेगवेगळे निकष लावून महिलांना अपात्र ठरवले जात आहे. जर त्या महिला अपात्र होत्या, तर त्यांना आधी लाभ का देण्यात आला? आणि जर त्या पात्र होत्या, तर आता त्यांना वगळण्याचे कारण काय? या योजनेवर १४ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला. या पैशांच्या नियोजनातील गोंधळ, चुकीचे निकष आणि राजकीय फायद्यासाठी केलेल्या निर्णयांचा हिशोब कोण देणार?

महिलांच्या भावनांशी खेळ करून, त्यांच्या नावावर राजकारण करून आणि सत्ता मिळताच त्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. लाडक्या बहिणींसाठी नव्हे, तर मतांसाठी योजना होती का? हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे!, असं वडेट्टीवार यांनी लिहीलं आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *