Weekly Horoscope 13 To 19 July 2026: जुलै महिन्याचा नवा आठवडा आज सुरू झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, हा आठवडा अनेकांचे भाग्य उजळणारा ठरत आहे, आजपासून सुरू झालेला हा आठवडा 13 ते 19 जुलै असा आहे. ग्रहांचं संक्रमण आणि शुभ योगामुळे हा आठवडा काही राशींसाठी भाग्याचा ठरेल, तर काहींना सावधगिरी बाळगावी लागेल, हा नवीन आठवडा कोणकोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी तूळ ते मीन अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा कामाचा ताण वाढू शकतो, पण तुमच्या कौशल्यामुळे सर्व अडचणींवर मात कराल. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ मिळेल, मात्र उधारी टाळा. जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल. आरोग्याच्या बाबतीत मान, पाठ किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी 13 ते 19 जुलैचा आठवडा हा करिअरमध्ये प्रगतीसाठी अनुकूल आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबातील एखादा वाद मिटेल. प्रेमजीवन आनंदी राहील. आरोग्याच्या दृष्टीने नियमित व्यायाम फायदेशीर ठरेल.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी जुलैचा नवा आठवडा नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. आर्थिक लाभाचे योग असून गुंतवणुकीत फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल. आरोग्य चांगले राहील, मात्र प्रवासात निष्काळजीपणा करू नका.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा कामात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात नवीन योजना फायदेशीर ठरतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. प्रेमजीवनात संयम आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत गुडघे किंवा हाडांशी संबंधित त्रास दुर्लक्षित करू नका.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. टीमवर्कमुळे मोठे यश मिळेल. आर्थिक लाभासोबतच बचतही वाढेल. मित्रांकडून मदत मिळेल. प्रेमजीवनात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याच्या दृष्टीने तणाव कमी करण्यासाठी योग किंवा ध्यानाचा आधार घ्या.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी जुलैचा नवा आठवडा भाग्याची साथ लाभेल. नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक घडामोडी होतील. अडकलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमजीवनात नाते अधिक दृढ होईल. आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या पाळल्यास उत्साह कायम राहील.
हेही वाचा :
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींची भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)