Sanjay Raut: भाजपने मेलेल्या गायीच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, 100 कोटींचा घोटाळा; संजय राऊत यांचा नवा बॉम्ब – Marathi News | Sanjay raut alleges 100 crore goshala scam launches fresh attack on bjp


सध्या राज्याच्या राजकारणात सतत काही ना काही घडामोडी घडत असल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर 14 आमदार शिंदे सेनेत जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर राम मंदिरातील दानपेटीचा घोटाळा समोर आला. आता या सर्वावर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल वक्तव्य केले. त्यात त्यांनी १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला आहे. ते नेमकं काय म्हणाले? वाचा…

सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून भ्रष्टाचार

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून भ्रष्टाचार आहे. रस्ते सोडून द्या. साडे तीनशे कोटीचा भ्रष्टाचार आहे. मी लवकरच देणार आहे. हिंदुधर्माच्या नावाने पैसा खात आहे. राम मंदिरापासून काळाराम मंदिरापासून. लाज वाटली पाहिजे. चंपत राय अयोध्येत नसून भाजपचं जिथे जिथे राज्य आहे, तिथे असे चंपत राय आहेत.

१०० गोशाला बोगस

पुढे ते म्हणाले, राजस्थानात गोशालांना अनुदान मिळते. १०० गोशाला बोगस आहे. मेलेल्या गायींवरही अनुदान घेतलं. भाजपने. भाजपचं राज्य असलेल्या राजस्थानमध्ये हे चाललं आहे. गोवंश हत्याबंदीचे कायदे आणता. त्यासाठी लिंचिंग करता. आणि मृत गोमातेच्या टाळूवरचं तुम्ही लोणी खाता. १०० कोटींचं अनुदान लाटता. मोदी, भागवत, दत्तात्रय होसबळे काय करत आहेत. हिंदुत्वाच्या नावाने लूट सुरू झाली आहे. श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या नावाने या गोशाला आहे. हे कोणत्या प्रकारचं हिंदुत्वाचं मॉडल आहे. कोणत्या प्रकारे हिंदुत्व आहे. हे हिंदु राष्ट्र नको आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविषयी काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते वारंवार बोलत असतात. अधूनमधून हिंदीत बोलत असले तरी महाराष्ट्रात मराठी सक्ती आहे हे विधान ते जोरात करतात. मग मराठी माणसाला त्रास का होतोय. त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. मराठी आत्मा आणि स्वाभिमान जीवंत असेल तर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *