शिवीगाळ अन् वक्तव्यांनी खळबळ उडवली; सुनिता अहुजानं अचानक ‘लॉक अप 2’ सोडला अन् गोविंदाची एन्ट्री; सुनिताविषयी केले मोठे खुलासे..


Govinda on Sunita Ahuja Lock Up: गेल्या काही दिवसांपासून ‘लॉक अप सीजन 2’ ची जोरदार चर्चा आहे. या सीजनमध्ये सगळ्याच स्पर्धकांनी आपल्या खळबळजनक वक्तव्यांमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या शोमध्ये सध्या अभिनेत्री आणि गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाची चर्चा रंगलीय. या रियालिटी शो मधूनच आता ती बाहेर पडली आहे. तिच्या एक्झिटनंतर तिला घेण्यासाठी स्वतः गोविंदा ‘लॉक अप 2 ‘ मध्ये पोहोचला होता. त्यावेळी त्याने सुनिता विषयी अनेक खुलासे केले, ज्याची सध्या मनोरंजनसृष्टीत चर्चा रंगली आहे. गोविंदा स्टेजवर येताच सुनीताला मोठा धक्का बसल्याचं दिसतं. सुनिता अहुजाने यापूर्वी अनेक मुलाखतींमध्ये गोविंदाला चुकून गोळी लागल्याच्या घटनेवरून मस्करी केली होती. शिवाय, अनेकदा सुनीताने गोविंदाचा अफेयर्सवरही कमेंट केला होत्या. या सगळ्यानंतर गोविंदाने सुनिता विषयीचे काही खुलासे केले आहेत. ‘लॉक अप’ शो मध्ये आल्यानंतर शोच्या पहिल्याच दिवशी सुनिताने अनेक खळबळजनक वक्तव्य केले होते.जसजसे दिवस पुढे गेले होते तसतसं सुनीताला जेलमध्ये राहणं अशक्य  होऊन बसलं. अनेकदा शोमधून बाहेर पडण्याविषयी विनंती केल्यानंतर अखेर सुनिता अहूजा यांनी ‘लॉक अप’शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

सुनिता अहुजाने का घेतला शो सोडण्याचा निर्णय?

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सुनीता आहुजाने होस्ट रितेश देशमुख आणि फराह खान यांच्याशी संवाद साधताना शो सोडण्यामागचं कारण सांगितलं. ती म्हणाली, “माझी तब्येत ठीक नाही. माझा डायबिटीज नियंत्रणात नाही. मी सतत तणावात आहे. त्यातच मी मेनोपॉजच्या टप्प्यातून जात आहे. शरीरात वेदना होत आहेत आणि श्वास घेण्यासही त्रास होतोय. त्यामुळे मी वारंवार मला घरी जायचं आहे, असं सांगत होते.” सुनीताच्या निरोपासाठी स्टेजवर आलेल्या गोविंदाने पत्नीचं कौतुक करताना तिला प्रेमाने ‘लहान बाळ’ असं संबोधलं. तो म्हणाला, “सुनीताने याआधी कधीच अशा प्रकारच्या कठीण परिस्थितीचा सामना केला नव्हता.”

याचवेळी त्याने एक मजेशीर खुलासाही केला. “माझे मित्र मला लॉक अपमधील सुनीताचे शिवीगाळ करतानाचे व्हिडिओ पाठवत होते. पण काही हरकत नाही… झेललंय सगळं,” असं गोविंदा म्हणाला. शोची होस्ट फराह खान हिने गोविंदाला विचारले की, “लोक सुनीताच्या बोलण्याच्या स्टाईलचे चाहते आहेत. ती घरीही अशीच बोलते का?” यावर गोविंदाने पत्नीला प्रेमाने ‘बच्चा’ म्हणत उत्तर दिले. “ती अजूनही लहान मुलीसारखी आहे,” असे ते म्हणाले. फराहनेही त्यांच्या या विधानाला दुजोरा दिला.

 

“घरातील गोष्टी घरातच राहू द्या”

फराह खानने सुनीताला विचारलं की, शोदरम्यान कुटुंबाविषयी केलेल्या वक्तव्यांनंतर काही शिकायला मिळालं का? यावर गोविंदाने उत्तर देत सांगितलं, “कुटुंबातील जे काही असेल, ते घरातच राहायला हवं.” पुढे तो म्हणाला, “मी माझ्या कुटुंबावर नेहमी प्रेम केलं आहे. देवाच्या कृपेने आम्हाला कठीण काळाचा सामना करावा लागू नये, अशीच इच्छा आहे.” नुकत्याच प्रसारित झालेल्या या भागात गोविंदा आणि सुनीता यांची मुलगी टीना आहुजा हिनेही हजेरी लावली. आईचा शोमधील प्रवास पाहताना अनेकदा आपण भावूक झाल्याचं तिने सांगितलं.

“गोविंदाचे अनेक अफेअर्स होते”

याआधी ‘लॉक अप 2’मधील एका भागात स्पर्धक श्रेया कालरा हिने सुनीताला तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारला होता. विवाहात फसवणूक झाल्याची भावना कधी आली का, असं विचारल्यावर सुनीता म्हणाली, “झालं असेल तर आता त्यावर काय करू शकते? हे सुरुवातीपासूनच होत होतं. तो हिरो आहे, त्यामुळे काही बोलता येत नाही. या वयात या गोष्टींचा विचार केला तर माझा डायबिटीज आणखी वाढेल. जे सुरू आहे, ते सुरू राहू दे. मी माझ्या मुलांसाठी जगते.” शोमध्ये प्रवेश केल्यानंतरही सुनीताने गोविंदाचे विवाहानंतर अनेक अफेअर्स होते, असा दावा केला होता. तिच्या या वक्तव्याची त्या काळात मोठी चर्चा झाली होती.

गोविंदा आणि सुनीता आहुजा यांनी 1987 मध्ये विवाह केला. मात्र, मुलगी टीना आहुजा जन्मल्यानंतरच त्यांनी आपल्या नात्याची सार्वजनिक कबुली दिली. या दाम्पत्याला यशवर्धन आहुजा नावाचा मुलगाही आहे. आजही हे दोघे बॉलिवूडमधील चर्चेतल्या जोडप्यांपैकी एक मानले जातात.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *