मीच ओरिजनल भाजपाई, भाजपचा संस्थापक असं एकनाथ शिंदे म्हणाले तरच मुख्यमंत्री होतील; संजय राऊत यांचा खोचक टोला – Marathi News | Sanjay raut slams to eknath shinde over chief minister post of maharashtra


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीसानंतर राज्यात मुख्यमंत्रि‍पदी कोण विराजमान होणार, यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत अनेकांची नावे समोर येत आहेत. परंतु मुख्यमंत्रिपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे सक्षम नेतृत्व आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला. तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही, असा पुनरूच्चार संजय राऊत यांनी केला. तर मीच ओरिजनल भाजपाई, भाजपचा संस्थापक असल्याचा दावा केल्यास ते मुख्यमंत्री होतील, असा खोचक टोला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

संजय राऊत यांनी आज रविवारी माध्यमांशी संवाद साधला. राऊतांनी राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. मुख्यमंत्रि‍पदावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, ‘बच्चू कडू काय म्हणतात मला माहीत नाही. पण मी म्हणालो, त्या मताशी ठाम आहे. शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही. शिवसेना फोडण्यासाठी फक्त त्यांचा वापर केला. त्यांना फोडून त्याची बक्षीस म्हणून मुख्यमंत्री केलं. एवढंच. त्यांचा कार्यभार संपला आहे. अहवाल सादर केला आहे. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करणार नाही. केंद्रात बदल झाले. फडणवीस यांना एखाद्या प्रमुख खात्यासाठी योग्य आहेत, असं मोदींना वाटलं. शंभर टक्के फडणवीस योग्य आहेत’.

‘महाराष्ट्र त्यांच्या हातात राहिला नाही. एचआरडीचं खातं आहे. २०२९ आधी ते पंतप्रधान व्हावं असं आम्हाला वाटतं. फडणवीस केंद्रात गेले तर शिंदे मुख्यमंत्री होत नाही. भाजपचा होईल. जर शिंदे भाजपमध्ये गेले. पक्ष विलीन केलं. आणि मी ओरिजनल भाजपवाला आहे. मीच भाजपची स्थापना केली. मी भाजपचा जन्मदाता आहे. अमित शाह कल का बच्चा आहे. बावनकुळे आणि महाजन हे माझे कार्यकर्ते आहेत, असं शिंदे म्हणाले तर ते कदाचित मुख्यमंत्री होऊ शकतील. पण बावनकुळे हे अधिक सक्षम आहेत. ते मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं, असे ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *