Mahalaxmi Rajyog 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. द्रिक पंचांगानुसार, 16 जुलै 2026 रोजी ग्रहांचा राजा सूर्य देव मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क राशीत देवगुरु बृहस्पती ग्रह आधीपासूनच विराजमान आहे. अशात कर्क राशीत सूर्य आणि गुरु ग्रहाची ही महायुती फार दुर्लभ आणि शुभ संयोग निर्माण होणार आहे.
सूर्य आणि गुरु ग्रह एकत्र आल्याने महालक्ष्मी राजयोग आणि नवपंचम योग निर्माण होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्याला सन्मान, सरकारी नोकरी आणि आत्म्याचा कारक ग्रह मानतात. तर, गुरु ग्रहाला ज्ञान, नशीब आणि धनचा कारक ग्रह मानतात. या दोन्ही ग्रहांची युती काही राशींसाठी फार भाग्यशाली ठरणार आहे. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी हा योग फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या जीवनात अनेक सुख-सुविधा पाहायला मिळतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, तुम्ही या काळात अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण करु शकता. घरातील वातावरण आनंदी असेल. तसेच, तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
सूर्याचं संक्रमण या राशीच्या लग्न भावात होणार आहे. या ठिकाणी गुरु ग्रह आधीपासूनच विराजमान आहे. या काळात तुमची निर्णय घेण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. तुमच्या पगारात चांगली वाढ झालेली दिसेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. नात्यात गोडवा निर्माण होईल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरु ग्रहाची युती अकराव्या स्थानी होणार आहे. महालक्ष्मी राजयोगामुळे तुमची आर्थिक संकट दूर होतील. नोकरदार वर्गातील लोकांना पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. ज्या लोकांना नवीन स्टार्टअप सुरु करायचा आहे ते या काळात सुरु करु शकतात.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी हा राजयोगाचा काळ फार शुभ काळ असणार आहे. या काळात तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तुमची लव्ह लाईफ अनुकूल असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Lord Shiva Favourite Zodiac Signs : महादेवाच्या ‘या’ 4 आहेत प्रिय राशी; श्रावण महिन्यात राशींना मिळणार बंपर लाभ; धनसंपत्तीत होणार भरभराट