पुणे : रात्रीच्या काळोखात पिकअपवरील नियंत्रण सुटलं, दोघांसह वाहन थेट खोल विहिरीत जाऊन कोसळलं, पण शेवटी ‘चमत्कार’ घडला | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

शनिवारी रात्री एक अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. शेतमाल घेऊन जाणारी एक पिकअप अचानक ओढ्याकाठच्या एका खोल विहिरीत कोसळली

पिकअप विहिरीत कोसळलं (प्रतिकात्मक फोटो)
पिकअप विहिरीत कोसळलं (प्रतिकात्मक फोटो)

नारायणगाव : पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव जवळील खडकवाडी येथे शनिवारी रात्री एक अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. शेतमाल घेऊन जाणारी एक पिकअप जीप अचानक ओढ्याकाठच्या एका खोल विहिरीत कोसळली. रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात पिकअप थेट विहिरीच्या तळाशी गेली, मात्र ऐनवेळी चालकाने आणि क्लीनरने घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे मृत्यूच्या दारातून ते सुखरूप परतले आहेत.

अंधारात अचानक सुटलं नियंत्रण

मिळालेल्या माहितीनुसार, खडकवाडी येथील एका शेतकऱ्याचा फ्लॉवरचा शेतमाल या पिकअप जीपमध्ये भरून ती बाजारपेठेकडे निघाली होती. रात्री आठच्या सुमारास खडकवाडी परिसरातील ओढ्याकाठून जात असताना, अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या ग्रामपंचायतीच्या एका जुन्या, वापरात नसलेल्या विहिरीच्या दिशेने वेगाने गेली.

क्षणार्धात मृत्यू डोळ्यांसमोर दिसला

गाडी विहिरीत कोसळणार हे लक्षात येताच, चालक आणि क्लीनरने जराही वेळ न घालवता चालत्या गाडीतून थेट बाहेर उड्या मारल्या. ते जमिनीवर कोसळले आणि त्यांच्या डोळ्यांदेखत ती अवजड पिकअप जीप थेट विहिरीच्या गडद अंधारात कोसळली. दोघांनी दाखवलेल्या या अद्भूत प्रसंगावधानामुळे एक अत्यंत मोठी जीवितहानी टळली.

अपघाताचा मोठा आवाज होताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने चालक आणि क्लीनर सुखरूप असल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. विहिरीत पडलेली पिकअप काढण्यासाठी रात्री नऊ-दहाच्या सुमारास गावात क्रेन पाचारण करण्यात आली. अखेर स्थानिक ग्रामस्थ आणि क्रेन चालकाच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही पिकअप विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. या अपघातात शेतमालाचे मोठे नुकसान झाले असले तरी दोन जीव वाचले.

मराठी बातम्या/पुणे/

पुणे : रात्रीच्या काळोखात पिकअपवरील नियंत्रण सुटलं, दोघांसह वाहन थेट खोल विहिरीत जाऊन कोसळलं, पण शेवटी ‘चमत्कार’ घडला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *