प्रेग्नंसीच्या थर्ड ट्रायमेस्टरमध्ये दीपिका पादुकोणला असा अनुभव; रील शेअर करताच तुफान व्हायरल – Marathi News | Deepika padukone second pregnancy at the age of 40 third trimester shared video


अभिनेत्री दीपिका पादुकोणने एप्रिल 2026 मध्ये दुसऱ्यांदा गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. तिच्या या पोस्टने चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला होता. दीपिका आणि रणवीर सिंह दुसऱ्यांदा आई-बाबा होण्यासाठी सज्ज आहेत. गरोदरपणात दीपिका तिच्या परिस्थितीशी मिळतेजुळते रील्स आणि पोस्ट शेअर करताना दिसत आहे. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. प्रेग्नंसीच्या तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये ती काय अनुभवतेय, हे यातून तिने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

शनिवारी 11 जुलै रोजी दिपिकाने सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अनुभवाबद्दल एक मजेशीर अपडेट शेअर केली आहे. तिने एक गमतीशीर रील पोस्ट केली आहे, ज्यामध्ये एक गरोदर महिला बाथरुमला जाण्यासाठी वाकून अलगद चालताना दिसत आहे. गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत अगदी असाच अनुभव आल्याचं दीपिकाने यातून अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे. या रीलवर तिने उलटा स्माइली इमोजीसुद्धा पोस्ट केला आहे.

दीपिकाने शेअर केलेला व्हिडीओ-

एप्रिल महिन्यात ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर रणवीर आणि दीपिकाने दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. इन्स्टाग्रामवर त्यांनी लेक ‘दुआ’चा एक फोटो पोस्ट केला होता. यामध्ये तिच्या हातात प्रेग्नन्सी टेस्ट दिसली होती, ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. ही पोस्ट शेअर करताच जगभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. दीपिका पादुकोणने 8 सप्टेंबर 2024 रोजी पहिल्या मुलीला जन्म दिला होता. रणवीर आणि दीपिकाने 2018 मध्ये इटलीत लग्न केलं होतं. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोघं लग्नबंधनात अडकले होते.

दीपिका आणि रणवीरची पहिली भेट एका पुरस्कार सोहळ्यात झाली होती. दीपिकाला पाहताचक्षणी रणवीर तिच्या प्रेमात पडला होता. मात्र ‘रामलीला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण झाली. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दीपिका-रणवीरला एकत्र आणण्यात मोठी भूमिका बजावली, असं म्हटलं जातं. या दोघांनी रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. भूतकाळातील काही अनुभव पाहता दीपिका सुरुवातील लग्नाबाबत संभ्रमात होती. मात्र अखेर दोघांनी 2015 मध्ये गुपचूप साखरपुडा केला होता. याविषयीचा खुलासा रणवीरने ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये केला होता. जवळपास तीन वर्षांपर्यंत त्यांनी साखरपुड्याबाबत कमालीची गुप्तता पाळली होती.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *