रणवीर, रणबीर या सगळ्यांच्या आधी ‘या’ अभिनेत्यानं केलंय दीपिका पदुकोणला डेट; वक्तव्याची एकच चर्चा; दोनदा मिळालाय शौर्य पुरस्कार


Bollywood Actor Dated Deepika Padukon Statement: बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukon) कायमच कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे प्रसिद्धीझोतात येते. कधी तिच्या पूर्वीच्या नात्यांमुळे तर कधी तिने कामातून घेतलेल्या ब्रेकमुळे तर कधी आठ तासांच्या शिफ्टमुळे. रणवीर सिंह आणि दीपिका आता दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत. दरम्यान, दीपिका चर्चेत आली आहे एका अभिनेत्याच्या दाव्यामुळे. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तो आणि दीपिका जवळपास दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा या अभिनेत्याने केला आहे. हा अभिनेता आणि मॉडेल म्हणजे मुजम्मिल इब्राहिम.

अलीकडील मुलाखतीत मुजम्मिलने दावा केला की, दीपिका पदुकोण मुंबईत आल्यानंतर दोघांची ओळख झाली आणि जवळपास दोन वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. त्याच्या म्हणण्यानुसार, म्युझिक व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर दीपिकानेच त्याच्याशी संवाद सुरू केला होता. दीपिकाचं रणवीर सिंहसोबत लग्न होईपर्यंत दोघांमध्ये मैत्री कायम होती, असाही दावा त्याने केला आहे.

दोनवेळा मिळालाय शौर्य पुरस्कार 

मुजम्मिल केवळ या वक्तव्यामुळेच नाही, तर अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी केलेल्या धाडसी कामगिरीमुळेही ओळखला जातो. अवघ्या आठव्या वर्षी त्याने मित्राचा जीव वाचवला होता. इतकंच नाही, तर आयुष्यात दोन वेळा शौर्य पुरस्कारही त्याच्या नावावर आहेत.25 ऑगस्ट 1986 रोजी श्रीनगरमध्ये जन्मलेल्या मुजम्मिल इब्राहिमचं बालपण जम्मू-काश्मीरमधील अस्थिर वातावरणात गेलं. 1994 मध्ये तो केवळ आठ वर्षांचा असताना त्याने आपल्या शाळेतील एका मित्राला बुडण्यापासून वाचवलं. या धाडसी कामगिरीबद्दल त्याला भारत सरकारकडून ‘जीवन रक्षा पदक’ या प्रतिष्ठेच्या शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.काही वर्षांनी गोव्यात सुट्टीदरम्यानही त्याने पुन्हा एकदा धाडस दाखवत अरबी समुद्रात बुडणाऱ्या एका ब्रिटिश महिलेचे प्राण वाचवले. या घटनेनंतर त्याला गॉडफ्रे फिलिप्स नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड मिळाला.2003 मध्ये मुजम्मिलने ‘ग्लॅडरॅग्स मॅनहंट’ स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर तो देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या पुरुष मॉडेल्सपैकी एक बनला. अनेक जाहिराती, म्युझिक व्हिडिओ आणि फॅशन शोमुळे त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली.

‘धोखा’मधून केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुजम्मिलने पूजा भट्टसोबत ‘धोखा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.त्यानंतर तो ‘गुड बॉय, बॅड बॉय’, ‘विल यू मॅरी मी?’ या चित्रपटांमध्ये झळकला. तसेच ‘स्पेशल ऑप्स’ या लोकप्रिय वेब सीरिजमध्येही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली.करिअरच्या सुरुवातीला मॉडेलिंग आणि चित्रपटांमध्ये चांगलं यश मिळूनही मुजम्मिलने प्रसिद्धीच्या मागे धावण्याऐवजी निवडक प्रकल्पांमध्ये काम करण्याला प्राधान्य दिलं. त्यामुळे बॉलिवूडमध्ये तो सुपरस्टार झाला नसला, तरी धाडस, मॉडेलिंग आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रांमधील त्याचा प्रवास आजही अनेकांच्या लक्षात आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *