अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान


मुंबई : ज्येष्ठ अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते प्रशांत दामले (Prashant Damle) यांची बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आल्याने आता मुंबई महापालिकेच्या कला विषयक कारभारात त्यांचा थेट सहभाग असणार आहे. मुंबईच्या (Mumbai) महापौर रितू तावडे यांच्या हस्ते आज (10 जुलै) रोजी त्यांना विश्वस्तपदी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यामुळे, प्रशांत दामले यांच्याकडे मुंबईच्या कला-क्रीडा प्रतिष्ठानची धुरा देण्यात आल्याचं दिसून येत आहे. दामले यांच्या कला क्षेत्रातील अनुभवाचा प्रतिष्ठानच्या कला व क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांना मोठा फायदा होईल, असा विश्वास महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

महापालिकेच्या क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने दामले यांच्या नियुक्तीला सर्वानुमते मंजुरी दिली. 36 नाटकांमधील 13,538 हून अधिक प्रयोगांचा जागतिक विक्रम दामले यांच्या नावावर असून त्यांच्या कामगिरीची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये 4 वेळा नोंद झाली आहे. केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने देखील प्रशांत दामले सन्मानित आहेत. सध्या ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. 

हेही वाचा

जयंत पाटलांचा भाजपला टोला; विरोधी पक्षनेता नाही, पक्ष विरोधी नेता मिळाला, भास्कर जाधवही सत्ताधाऱ्यांवर संतापले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *